शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला :  करवाढ प्रकरणाचा सात दिवसांत सोक्षमोक्ष;  डॉ. रणजित पाटील यांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:03 IST

अकोला : करवाढ प्रकरणाचा सात दिवसांत सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी सभेचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाने अकोलेकरांवर लादलेली करवाढ नियमबाह्य असल्याचा मुद्दा काँग्रेस, शिवसेना तसेच भारिप-बमसंने लावून धरला आहे. बुधवारी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात करवाढीच्या मुद्यावर सुनावणी घेण्यात आली. डॉ.रणजीत पाटील यांनी ३ एप्रिल २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, तसेच रेकॉर्डिंग (चित्रफीत) सात दिवसांत सादर करण्याचे मनपा प्रशासनाला निर्देश दिले.

अकोला : महापालिका प्रशासनाने लागू केलेली सुधारित करवाढ अवाजवी असल्याचा आक्षेप घेत भारिप-बहुजन महासंघ तसेच काँग्रेसच्यावतीने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या मुद्यावर बुधवारी मुंबईत नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात सुनावणी पार पडली असता, करवाढ प्रकरणाचा सात दिवसांत सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी सभेचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर लादलेली करवाढ नियमबाह्य असल्याचा मुद्दा काँग्रेस, शिवसेना तसेच भारिप-बमसंने लावून धरला आहे. या प्रकरणी भारिप-बमसं व काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. विभागीय आयुक्तांनी करवाढीच्या मुद्यावर १३ पानांचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करीत प्रशासनाने केलेल्या करवाढीवर बोट ठेवले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार असल्याची चर्चा होती. बुधवारी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात करवाढीच्या मुद्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीसाठी मनपाच्यावतीने आयुक्त जितेंद्र वाघ, भारिप-बमसंचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे महासचिव मदन भरगड, मनपा गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव, अ‍ॅड. संतोष रहाटे, प्रतिभा अवचार, प्रदीप वखारिया आदी उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: बाजू मांडत करवाढ नियमबाह्य असल्याचे नमुद केले. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रशासनाला मालमत्तांना सील लावण्याची कारवाई थांबवण्याचे निर्देश द्यावे, अशी सूचना मदन भरगड यांनी केली. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी करवाढ नियमानुसारच केल्याचे स्पष्ट केल्यानंतर, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी ३ एप्रिल २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, तसेच रेकॉर्डिंग (चित्रफीत) सात दिवसांत सादर करण्याचे मनपा प्रशासनाला निर्देश दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका