शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सुपर स्पेशालिटीसाठी शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 14:25 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला.

अकोला: सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या पद निर्मितीचा तिढा सोडविण्यास प्राधान्य असून, लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले. सोबतच सर्वोपचार रुग्णालयात महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले असून, त्याची सुरुवात १२ जानेवारीपासून होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागातील विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा आढावा घेताना खाटांची संख्या, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा तसेच इमारतीच्या बांधकामासंदर्भात माहिती घेतली.दरम्यान, पद निर्मितीला मंजुरीचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाला धारेवर धरले असून, महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले.या अभियानाची सुरुवात १२ जानेवारी रोजीपासून होणार आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर अर्चना मसने यांच्यासह सर्व नगरसेवकांना सूचना दिली. कार्यक्रमात सर्वच आमदार, मनपा आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याबाबत सूचना दिल्या.आढावा बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जितेंद्र वाघ, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कु लवाल, प्रशासकीय अधिकारी संजीव शर्मा, डॉ. श्यामकुमार शिरसाम व डॉ. दिनेश नैताम यांची उपस्थिती होती.‘जीएमसी’च्या इमारतीला ‘व्हाइट वॉश’सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतींची रंगरंगोटी करण्याची मागणी आढावा बैठकीदरम्यान जीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आली. या मागणीला मान्यता देत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तथा सर्वोपचार रुग्णालयाच्या इमारतींना पांढरा रंग देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिली.

दलालांच्या मुद्यावर धरले धारेवरआरोग्य विभागातील विविध विकास कामांचा आढावा घेत असताना आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालयातील दलालांचा मुद्दा उपस्थित केला. शिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून दलालांची नावे उघड करण्यात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अधिष्ठातांना धारेवर धरत दलालांची नावे उघड करण्याबाबत सूचना दिल्या.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय