शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अकोला : सुभाष भडांगे यांची दर्यापूरला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:51 IST

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांची अचानक दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळुदकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सांगळुदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्‍वर भिसे हे प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळतील. 

ठळक मुद्देडॉ. रामेश्‍वर भिसे शिवाजी महाविद्यालयाचे नवे प्राचार्य 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांची अचानक दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळुदकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सांगळुदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्‍वर भिसे हे प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळतील. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे हे १९८0 मध्ये शिवाजी महाविद्यालय अकोट येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.  दरम्यान, अध्यापनाचे कार्य करीत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये विज्ञान अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्यपद त्यांनी दोनवेळा भूषविले. अमरावती विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम केले. तसेच विद्यापीठाच्या विद्वत परिषद, अभ्यास मंडळावर त्यांनी काम करून कार्याचा ठसा उमटविला. मे २00५ मध्ये डॉ. भडांगे हे अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले. अल्पावधीतच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरले. ११ वर्षांच्या त्यांच्या कारर्किदीमध्ये त्यांनी शिवाजी महाविद्यालयाला यशोशिखरावर नेले. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात ‘कमवा आणि शिका’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. प्राचार्य डॉ. भडांगे यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची पावती म्हणून राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेने सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.  त्यांच्या सेवानवृत्तीला एक वर्ष उरले असताना, त्यांची दर्यापूरला बदली करण्यात आली. 

प्रा. डॉ. भडांगे यांच्या कार्यकाळात उंचावला श्री शिवाजी महाविद्यालयाचा स्तर- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अमरावती विद्यापीठात तिसर्‍या सायकलमध्ये ए ग्रेड मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे पहिले महाविद्यालय- श्री शिवाजी महाविद्यालयाला ‘पोटेन्शियल एक्सलंस दर्जा’- अमरावती विद्यापीठातून लीड कॉलेजचा दर्जा- शिवाजी महाविद्यालयात दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले केंद्र- दिल्ली येथील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी यांच्याकडून अनुदान मिळणारे विदर्भातील पहिले महाविद्यालय.- शिवाजी महाविद्यालयातील ग्रंथालय देशातील पहिल्या टॉप टेनमध्ये.- अमरावती विद्यापीठात ‘फॉरेन्सिक सायन्स’ हा अभ्यासक्रम केवळ शिवाजी महाविद्यालयात.- एम. ए. फिलॉसॉफी व सायकोलॉजी अभ्यासक्रम केवळ शिवाजी महाविद्यालयात.- सर्वात जास्त म्हणजेच तब्बल २२ वर पोस्ट ग्रॅज्युऐशनचे अभ्यासक्रम असणारे एकमेव महाविद्यालय.- अमरावती विद्यापीठातून सर्वाधिक विद्यार्थी मेरिटमध्ये येणारे - दोन हजार विद्यार्थीसंख्या असताना पदभार घेतल्यानंतर ही संख्या आता तब्बल सात हजारांवर गेली आहे.- डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांचे स्मारक. - एम.एस.सी. जीओइन्फरमेटिक्स अभ्यासक्रम असणारे महाविद्यालय.- दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त प्रवेश असणारे महाविद्यालय- ‘कमवा व शिकवा’ योजना प्रभावीपणे राबविणारे महाविद्यालय- आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा व राहण्याचा खर्च उचलला. 

टॅग्स :Akolaअकोला