लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पूरपीडित कॉलनी येथील मिया भाई नामक व्यक्तीच्या वरली मटक्याचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने जुगार अड्डय़ावर अचानक छापा घालून जुगार खेळणारे राजेश सुखदेव सदांशिव, बंडू विठ्ठल काळे, राजकुमार मोती बमन, अन्सार खान काले खान, गजानन गवई यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल
अकोल्यात विशेष पोलीस पथकाचा जुगार अड्डय़ावर छापा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:03 IST
अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दु पारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोल्यात विशेष पोलीस पथकाचा जुगार अड्डय़ावर छापा!
ठळक मुद्देपाच जणांना अटक रोख व मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त