शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

Akola: अरेरावी करणाऱ्या कंत्राटदाराला बदडले, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने दिला चाेप

By आशीष गावंडे | Updated: October 27, 2023 21:44 IST

Akola News: प्रभागातील विकास कामांच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासाेबत अरेरावी करणे महापालिकेतील एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. माजी नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता विकास कामांना प्रारंभ करणाऱ्या कंत्राटदाराला बदडल्याची घटना गुरुवारी प्रभाग क्रमांक १८ मध्ये घडली.

- आशिष गावंडे अकाेला - प्रभागातील विकास कामांच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासाेबत अरेरावी करणे महापालिकेतील एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. माजी नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता विकास कामांना प्रारंभ करणाऱ्या कंत्राटदाराला बदडल्याची घटना गुरुवारी प्रभाग क्रमांक १८ मध्ये घडली. संबंधित कंत्राटदार हा नेहमीच वादग्रस्त भूमिका घेत असल्याची चर्चा यानिमीत्ताने मनपाच्या वर्तुळात रंगली हाेती. 

शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी राज्य शासनाकडून काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त हाेत आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना,नागरी दलित वस्ती सुधार याेजनेसह दलितेतर याेजनेतून शहरात विविध विकास कामे निकाली काढली जात आहेत. काही महिन्यांपूर्वी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेतून प्रभाग क्रमांक १८ मध्ये रस्ते, नाल्या, धापे, पेव्हर ब्लाॅक आदी कामांची निविदा प्रसिध्द करण्यात आली हाेती. संबंधित कंत्राटदाराने शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या प्रभाग क्रमांक १८ मधील काही विकास कामांच्या निविदा जाणीवपूर्वक कमी दराने सादर केल्या. त्यामुळे निविदेत स्पर्धा हाेऊन इतर कंत्राटदार आपसूकच बाजूला सारल्या गेले. यासर्व बाबींचा परिपाक विकास कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर समाेर आला. याच मुद्यावरुन शुक्रवारी सायंकाळी कंत्राटदाराला बदडण्यात आल्याची माहिती आहे. 

कमी दराच्या निविदा; कामात खाेळंबामहापालिकेत प्रशासकराज आल्यापासून काही कंत्राटदार जाणीवपूर्वक कमी दराने निविदा अर्ज सादर करुन विकास कामात खाेळंबा निर्माण करीत असल्याची बाब समाेर आली आहे. यामुळे दर्जेदार बांधकाम करणारे कंत्राटदार आपसूकच निविदा स्पर्धेत बाद हाेऊन बाजूला सारल्या जात आहेत. विकास कामांना सुरुवात केल्यानंतर काही दिवसातच ही कामे निकृष्ट दर्जाची ठरत आहेत. असाच प्रकार प्रभाग क्रमांक ९ मध्ये नाली व रस्त्याच्या बांधकामात उघडकीस आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेने हा प्रकार उजेडात आल्यानंतरही पश्चिम झाेन कार्यालयातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांकडून ‘त्या’ कंत्राटदारावर कारवाइ हाेत नसल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्हं उपस्थित हाेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला