शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Akola: धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट; पाणीटंचाईचे ओढवणार संकट? मान्सून लांबल्याने वाढली चिंता

By रवी दामोदर | Updated: June 17, 2023 18:49 IST

Akola: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे.

- रवी दामोदर

अकोला  -  अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ २६ टक्केच जलसाठा राहिला असून, इतर धरणांच्या पातळीतही कमालीची घट झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४२ अंशाच्या खाली येत नसल्याने बाष्पीभवन वाढले आहे.

जिल्ह्यातील उन्हाचे चटके कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यातच उन्हाच्या तीव्रतेने धरणांतील जलसाठ्यात होणारी घट चिंता वाढवणारी आहे. काटेपूर्णा धरणात केवळ २६ टक्केच साठा उपलब्ध आहे. तर इतर धरणाची स्थितीही तशीच आहे. पाऊस पुढे लांबल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे टेन्शन वाढणार आहे. आगामी पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता त्यानुसार, नियोजन करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कमी होईनाजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात घट झाल्याचे जाणवले. मात्र, तेव्हापासून तापमानात सतत वाढ होत असून, पारा ४२ अंशावरच आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणामध्ये बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने धरणातील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे.

नदी, नाले कोरडे, उपाययोजना गरजेचीजूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. उन्हाच्या तीव्रतेने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. तसेच नदी, नाले कोरडे झाल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाणी पुरवठ्यासंबंधी उपाययोजना आखण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असा आहे जलसाठा

प्रकल्पाचे नाव            आजचा उपयुक्त जलसाठा             टक्केवारी

काटेपूर्णा             २३.२९                                    २६.९७

वान प्रकल्प             ३०.१९                         ३६.८४मोर्णा                         १६.०९                                    ३८.८२

निर्गुना                         ६.५०                                     २२.५३उमा                         १.१०                                     ९.४३

एकूण लघू                         २९.०४                         ३०.०२

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई