शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : एसडीओ, तहसीलदारांना आज बजावणार ‘शो-कॉज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:18 IST

अकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही तहसीलदारांना बुधवारी जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस (शो -कॉज) बजावणार आहेत.

ठळक मुद्देकपाशी नुकसानाचा अहवाल सादर करण्यात दिरंगाई

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचे अहवाल आदेश देऊनही २६ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यामुळे कपाशी पीक नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने जिल्हय़ातील चार उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि सातही तहसीलदारांना बुधवारी जिल्हाधिकारी कारणे दाखवा नोटीस (शो -कॉज) बजावणार आहेत.राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे आणि  तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्‍यांना दिला होता. त्यानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यांत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले; परंतु जिल्हय़ातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे तालुकानिहाय कपाशी नुकसानाचे अहवाल २६ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांमार्फत जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल २६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला नाही. त्यानुषंगाने कपाशी नुकसानाचे अहवाल सादर करण्यात दिरंगाई झाल्याने जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार उपविभागीय अधिकार्‍यांसह अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.

नुकसानाचे पंचनामे पूर्ण!जिल्हय़ात १ लाख ३0 हजार १२६ हेक्टर कपाशी पेरणीचे क्षेत्र असून, या सर्व क्षेत्रावरील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पंचनामे पूर्ण करण्यात आले असले, तरी पीक नुकसानाचे तालुकानिहाय अहवाल मात्र २६ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.

जिल्हय़ातील कपाशी नुकसानाचे तालुकानिहाय अहवाल २६ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश तहसीलदार, ‘एसडीओं’ना दिला होता; परंतु पीक नुकसानाचा अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय