शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शिवसेनेने राखला मलकापूर पंचायत समिती गण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:35 IST

अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. 

ठळक मुद्देअमोल पाटील विजयी भारिप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.  अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाचे शिवसेनेचे सदस्य मंगेश काळे गतवर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंचायत समितीच्या मलकापूर-१ या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी येवता येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा या एकाच केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदानात एकूण ९६५ मतदारांपैकी ६९0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर रोजी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमोल उद्धवराव पाटील आणि भारिप-बमसं पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपाल गोपनारायण हे दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. दुरंगी लढतीत शिवसेनेचे अमोल पाटील यांनी ४0१ मते प्राप्त करून विजय मिळविला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारिप-बमसं पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपनारायण यांना २७५ मते मिळाली. अमोल पाटील विजयी झाल्याने पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाची जागा कायम राखण्यात शिवसेनेला यश आले असून, भारिप-बमसं पुरस्कृत उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.

प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ‘भारिप’ला अपयश!अकोला पंचायत समिती मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राजकुमार गोपनारायण यांना भारिप-बमसंच्यावतीने पुरस्कृत करण्यात आले. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी भारिप-बमसंच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसह जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केले; परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला निवडून आणण्यात जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भारिप-बमसंला अपयश आले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणElectionनिवडणूक