लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शैलेश अढाऊ हत्याकांडात आरोपींनी वापरलेले शस्त्र व कपडे जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून शुक्रवारी जप्त केले आहेत. हत्याकांडात आणखी काही आरो पींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अग्रवाल याच्या प्लॉटमध्ये ठेवलेले बांबू जाळल्याच्या वादातून जुने शहरातील दोन गट समोरासमोर आले होते. त्यांच्यामध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये शैलेश अढाऊ याची ह त्या करण्यात आली, तर काही जण जखमी झाले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यामध्ये मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलासह तुषार दिलीप नागलकर, सचिन दिलीप नागलकर, अक्षय विनायक नागलकर, विनायक नागलकर, अमोल दिलीप नागलकर, अमर प्रभाकर भगत, सोनू अनिल धनेवार यांना अटक केली. सध्या आरोपी हे पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून घातलेले कपडे, हल्ल्यासाठी वापरलेले शस्त्र शुक्रवारी जप्त केले.
अकोला : शैलेश अढाऊ हत्याकांड; कपडे, शस्त्र जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:21 IST
अकोला : शैलेश अढाऊ हत्याकांडात आरोपींनी वापरलेले शस्त्र व कपडे जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून शुक्रवारी जप्त केले आहेत. हत्याकांडात आणखी काही आरो पींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अकोला : शैलेश अढाऊ हत्याकांड; कपडे, शस्त्र जप्त
ठळक मुद्देहत्याकांडात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता