शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:12 IST

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भावतपासणी पथकाच्या अहवालावरून होणार गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांचे कापसाचे तब्बल ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याचा अहवाल एमआयडीसी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे. बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध हा अहवाल असून, यामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  तपासणी पथकाच्या या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी बयान नोंदविण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कंपन्याविरुद्ध होणार गुन्हा दाखल!कावेरी सीड्स सिकंदराबाद, आदित्य सीड्स सिकंदराबाद, राशी सीड्स मेडक तेलंगणा, रॅलीज सीड्स मुंबई, अजित सीड्स प्रा. लि. औरंगाबाद, वायरक्रॉप सायन्स ठाणे या सहा कंपन्यांनी हजारो शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा अहवाल कृषी विभागाने रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेला आहे. 

सहा शेतकरी फसले!प्राथमिक चौकशीत सहा शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे; मात्र केवळ तक्रारींसाठी सहा शेतकरी समोर आले असून, फसवणूक हजारो शेतकर्‍यांची झाली आहे. या हजारो शेतकर्‍यांचीही फसवणूक झाल्याचे निश्‍चित असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास यामध्ये हजारो शेतकरी तक्रारीसाठी पुढे येणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कृषी विभाग तसेच संबंधित विभागाच्या तपासणी पथकाचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला . या अहवालामध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांनी सहा शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.  मात्र तरीही या अधिकार्‍यांचे बयान नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. - किशोर शेळके,ठाणेदार, एमआयडीसी पोलीस ठाणे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूस