शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला - शहरातील ४२ हजार गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन

By आशीष गावंडे | Updated: September 10, 2022 19:47 IST

मनपाकडून १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर; निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था

अकाेला:‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या गणरायाला भाविकांनी शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात निराेप दिला. मनपा प्रशासनाने तयार केलेल्या मुख्य गणेश घाटासह शहराच्या विविध भागातील विसर्जन कुंडात मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली हाेती. यादरम्यान, सुमारे ४२ हजार घरगुती गणेश मुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. याकरीता मनपाकडून झाेन निहाय १८ ट्रॅक्टर, ५ टिप्पर व निर्माल्यासाठी ९० वाहनांची व्यवस्था करण्यात आली हाेती. 

विघ्नहर्ता, बुध्दीची देवता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे ३१ ऑगस्ट राेजी ढाेल ताशांच्या गजरात व माेठ्या उत्साहात आगमन झाले हाेते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करताना काही निर्बंध घालण्यात आले होते. परंतु यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याची प्रचिती आगमना दरम्यान दिसून आली हाेती. घराेघरी, गल्लीबाेळात व प्रमुख चाैकांमध्ये माेठ्या दिमाखात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. ‘एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्तासह, मनपाच्या बांधकाम, विद्यूत व माेटार वाहन, स्वच्छता व आराेग्य तसेच अग्निशमन विभागाची यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून आले.

मुख्य घाटावर भाविकांची गर्दीमनपा प्रशासनाच्यावतीने महाराणा प्रताप बागेमागील माेर्णा नदीच्या काठावर मुख्य गणेश घाट सज्ज ठेवण्यात आला हाेता. याव्यतिरिक्त हरिहरपेठ, हिंगणा येथे गणेश घाट तयार केले हाेते. दुपारी १ नंतर भाविकांची मुख्य गणेश घाटावर गर्दी झाल्याचे दिसून आले. याठिकाणी मनपाने प्रकाश व्यवस्था, निर्माल्य संकलन व्यवस्था व मुर्ती घेउन जाण्यासाठी टिप्पर, ट्रॅक्टर व घंटागाड्यांची व्यवस्था केली हाेती. प्रभागांमध्ये गणेश कुंडमनपाच्या मुख्य गणेश घाटावर गर्दी टाळण्यासाठी शहरातील चारही झाेनमध्ये गणेश कुंड तयार करण्यासाठी माजी नगरसेवक व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हरिष आलीमचंदानी, माजी उपमहापाैर वैशाली शेळके, विलास शेळके, माजी सभागृनेत्या गितांजली शेगाेकार, राहुल देशमुख, माजी उपमहापाैर विनाेद मापारी, निलेश देव यांसह विविध सामाजिक संघटनांचा समावेश हाेता.

टॅग्स :ganpatiगणपतीAkolaअकोला