शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात रेस्टॉरंट्स बनले लव्हर्स पॉइंट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:02 IST

शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देरणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड भागात ही दृश्ये दिसतात. मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही.स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही.

- सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनियासे नही डरेंगे हम दोनो...हे गाणे एकेकाळी फार गाजले होते. असेच काहीसे चित्र शहराच्या गल्लीबोळात, रेस्टॉरंट्स आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये सर्रास पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे, आपल्या मुलांच्या या गुणांविषयी पालकांना काहीच माहीत नसले तरी त्यांच्यावर असलेला आंधळा विश्वास आई-वडिलांचाच विश्वासघात करणारा असल्याचे पोलीस ठाण्यांमध्ये घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते. मुली पळून गेल्यानंतर ५७ पैकी ४६ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले; मात्र याच मुलींनी नंतर ज्यांच्यासोबत गेल्या त्यांच्यासोबतच लग्न केल्याचेही समोर आले आहे.मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या आधुनिक राहणीमानाचे लोण अकोल्यातही धडकले आहे. मुले दहावीत जात नाहीत, तोच त्यांना महागड्या गाड्या, मोबाइल पालकांकडून पुरविले जातात. याचा उपयोग मुले कसा करीत आहेत, यावर मात्र पालकांचे अजिबात नियंत्रण नसल्याचे वास्तव सध्या शहरात पाहावयास मिळत आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमध्ये ही मुले काय दिवे लावतात, याची माहिती जेव्हा पालकांना होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. शहरातील रेस्टॉरंट्स आणि गल्लीबोळामध्ये ही अल्पवयीन मुले, मुली रोज संध्याकाळी प्रेमलीलांमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ, शासकीय दूध डेअरीमागील परिसर, गोरक्षण रोड अशा अनेक भागात सहज फेरफटका मारला तरी ही दृश्ये दिसतात. ही मुले, मुली अनेकदा घोळक्याने असतात, त्यामुळे कुणाला शंका येत नाही; परंतु वस्तुस्थिती निराळीच असते. लहान वयात चुकीच्या दिशेने पडणारी आपल्या मुलांची पावले पालक ओळखू शकत नसल्याची खंत पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुलांवर आंधळा विश्वास आणि अति प्रेमापोटी त्यांना जास्तीचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे आई-वडिलांनाच गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे वास्तव आहे.

स्कार्फ नव्हे सुरक्षा कवचचेहरा स्कार्फने झाकून घेण्याची मुलींची सवय एक प्रकारे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच ठरू लागली आहे. स्कार्फ बांधून बॉयफे्रंडसोबत कुठेही फिरली तरी कोणी ओळखत नाही, याची त्यांना खात्री असते. हा स्कार्फच आता मुलींचे संरक्षण करीत असल्याचे दिसून येत आहे.

५७ पैकी ४६ महिला मुलींना आणण्यात यशजिल्ह्यातील एकूण ५७ महिला व मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी ४६ महिला होत्या. यामधील ३९ महिलांना आणण्यात पोलिसांना यश आले तर ७ महिला परतच आल्या नाहीत, तर ११ अल्पवयीन मुली असून, यामधील ७ मुलींना परत आणण्यात पोलिसांची मोठी कामगिरी असल्याची माहिती आहे. यामधील ४ मुलींनी परत येण्यास नकार दिला. यानुसार जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या तसेच पळून गेलेल्या ५७ पैकी ४६ महिला व मुलींना आणण्यात पोलिसांना यश आले असून, ११ महिला व मुलींनी येण्यास नकार दिला.तसेच त्यांचा पत्ता लागला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीcollegeमहाविद्यालय