लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतक-यांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदत निधी शासनामार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीचे संबंधित तहसील कार्यालयांना वितरण करण्यात येणार असून, मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.गत ११ फेबु्रवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकºयांचे १ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील गारपीटग्रस्त २ हजार ७८९ शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदतनिधी ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, तहसील कार्यालयांमार्फत गारपीटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
अकोला :गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:23 IST
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतक-यांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदत निधी शासनामार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीचे संबंधित तहसील कार्यालयांना वितरण करण्यात येणार असून, मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अकोला :गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत प्राप्त
ठळक मुद्दे शेतक-यांच्या खात्यात होणार रक्कम जमा