शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 14:07 IST

अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली.

अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली. अकोला परिसरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ते आले असताना त्यांनी ही सुविधा देण्याचे निर्देश दिले.भुसावळ मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आगामी २२ डिसेंबर रोजी अकोल्यात आढावा घेण्यासाठी येत आहेत. मुंबईचे महाव्यवस्थापक यांचा अकोला दौरा असल्याने भुसावळ डीआरएम यादव यांचे दौरे वाढले आहेत. गुरुवारी रात्री शर्मा बडनेरा येथे मुक्कामी थांबले. दरम्यान, शुक्रवारी ११.४० वाजता ते अकोला रेल्वेस्थानकावर आले. स्थानकावरील साफसफाई, तिकीट घरांच्या सुविधा आणि पार्किंग व्यवस्थेची पाहणी त्यांनी यादरम्यान केली. फोर व्हीलर पार्किंगच्या अनेक समस्या असल्याच्या तक्रारी असल्याने यादव यांनी या पार्किंगला भेट देऊन इन-आउट गेटची सुविधा करण्याच्या सूचना आरपीएफ-जीआरपीला दिल्यात. दरम्यान, तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी झेडआरयूसीसी सदस्य वसंत बाछुका, नितीन मल, निला, अकोला स्टेशन प्रबंधक ब्रजेश कुमार व राजेश दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. अकोल्यातील रॅम्पच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते शेगावकडे रवाना झाले. 

- फोर व्हीलर पार्किंगचा मुद्दा अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. यादव यांच्या आधी दोन डीआरएम बदलून गेले; मात्र समस्या ‘जैसे थे’ राहिली आहे. यादव यांच्या निर्देशांचे पालन कितपत होते, याकडे लक्ष द्यावे लागेल.-वसंत बाछुका, झेडआरयूसीसी, अकोला. 

-फोर व्हीलर पार्किंगसाठी सोडलेल्या जागेवर टू व्हीलर आणि आॅटोरिक्षांची पार्किंग असते. पार्किंगची रक्कम घेऊनही रेल्वेस्थानकावर सुविधा मिळत नाही. येथे केवळ अधिकारी आले की शिस्त दिसते.-ठाकूरदास चौधरी, जागरूक नागरिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक