शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:36 IST

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे भाग्य २५0 मतदार ठरविणार आहेत.

ठळक मुद्दे१५ उमेदवारांचे भाग्य ठरविणार २५0 मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे भाग्य २५0 मतदार ठरविणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत सात उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सात जागांसाठी  १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, उमेदवारांचे भाग्य पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेत २५0 मतदार ठरविणार आहेत. या निवडणुकीसाठी अकोल्यातील तीन केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर एक तहसीलदार मतदान केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी याप्रमाणे तीनही मतदान केंद्रांवर गुरुवारी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतमोजणी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे, असे नायब तहसीलदार (निवडणूक ) सतीश काळे यांनी सांगितले.

या’ केंद्रांवर  होणार मतदान!डीपीसी निवडणुकीसाठी अकोला शहरातील तीन मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक जागेसाठी अकोला तहसील कार्यालय सभागृह येथे, महानगरपालिका मतदारसंघातील ४ जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृह येथे आणि नगरपालिका मतदारसंघातील २ जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सेतू सभागृह येथे मतदान घेण्यात येणार आहे.

निवडणूक रिंगणात असे आहेत उमेदवार! जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून एका जागेसाठी महादेव गवळे व सरला मेश्राम, मनपा मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी शारदा ढोरे, शीतल गायकवाड व खान शहीन अंजुम महेबूब आणि सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी महापौर विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी व मंगेश काळे तर नगरपालिका मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून एका जागेसाठी राजेश खारोडे, मुशीरुल हक अमीरुल हक, नासीर हुसेन सफदर हुसेन, मीतेश मल्ल आणि नामाप्र स्त्री प्रवर्गातून एका जागेसाठी रेशमा अंजुम अफजलखा, गंगा चंदन, सुनीता भुजबले इत्यादी १५ उमेदवार आहेत. 

‘डीपीसी’वर  नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्तीजिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या नियोजन विभागामार्फत बुधवारी काढण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती शासनाच्या नियोजन विभागामार्फत करण्यात येते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश नियोजन विभागामार्फत काढण्यात आला. त्यामध्ये भाजपाचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, नगरसेवक हरीश आलिमचंदाणी, गणेश तायडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, माजी उपजिल्हाप्रमुख सेवकराम ताथोड व रा.स्वं. संघाचे नगरसंघचालक गोपाल खंडेलवाल यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर