शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:41 IST

​​​​​​​अकोला : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देतयारी पूर्ण २४ जागांसाठी ५४ उमेदवार ; तेल्हार्‍यात २, मूर्तिजापुरात ३, बाश्रीटाकळीत ४, बाळापुरात ३ ग्रा.पं. साठी निवडणूक लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ९४ ग्रामपंचायतींच्या आठ सरपंच पदांसाठी आणि १६८ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आठ सरपंच पदांसाठी आणि ७४ सदस्य पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून, ७0 सदस्य पदांची निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे १८ ग्रामपंचायतींच्या २४ सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी २१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, ८ हजार ४८६ मतदार निवडणूक रिंगणातील मतदारांचे भाग्य ठरविणार आहेत. मतमोजणी बुधवारी संबंधित तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.

घुंगशीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानमूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येत आहे. एक सरपंचपद आणि सहा सदस्य पदांसह एकूण सात जागांसाठी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक