लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस कर्मचारी रोहित गिरीशचंद्र तिवारी याला बुधवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या एका भागातील युवतीने बुधवारी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार, अकोट येथे कार्यरत पोलीस कर्मचारी रोहित तिवारी हा काही दिवसांपासून तिची छेड काढत असल्याचा आणि तिला त्रास देत असल्याचा आरोप केला. तिच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी पोलीस कर्मचारी रोहित तिवारी याच्याविरूद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने, त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
अकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:15 IST
अकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस कर्मचारी रोहित गिरीशचंद्र तिवारी याला बुधवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
अकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस गजाआड
ठळक मुद्देपोलीस कर्मचारी रोहित गिरीशचंद्र तिवारी याला बुधवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी अटक केली