शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : चोरट्याने पळविलेला ट्रक जुने शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:44 IST

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून तो खामगावनजीक पकडला.

ठळक मुद्देखामगावपर्यंत केला मध्यरात्री पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग करून तो खामगावनजीक पकडला.मारोती नगर येथील रहिवासी किशोर गोविंदराव मगरे यांचा एम एच ३0 एबी ६११ क्रमांकाचा ट्रक त्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता घरासमोर उभा केला. घरी जेवण करून ते ट्रक घेऊन निघण्याच्या तयारीत असतानाच अज्ञात चोरट्यांनी  त्यांचा  ट्रक घेऊन पळ काढला. किशोर मगरे यांचा मुलगा बाळापूर नाक्यावर उभा असताना त्याला ट्रक दुसराच कुणीतरी व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. त्याने तातडीने वडिलांना फोन करून विचारले असता ट्रक चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी ट्रक चोरीची माहिती तातडीने जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. जुने शहरचे पोलीस अधिकारी सतीश पाटील हे रात्रगस्तीवर असताना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रकचा पाठलाग सुरू केला. सुसाट जात असलेल्या ट्रक चालकाची माहिती बुलडाणा व खामगाव पोलिसांना दिली. त्यांनीही नाकाबंदी केली, मात्र त्यांच्या नाकाबंदीतूनही हा ट्रक पळाला. ट्रकच्या मागावरच असलेले सतीश पाटील यांनी ट्रकला मागे टाकल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. पाटील यांच्या कार्यत्परतेने हा ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले. या ट्रकमध्ये तब्बल ४0 लाख रुपयांचे साहित्य असून, ट्रकची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. ट्रक पळविणार्‍या चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सतीश पाटील यांनी केला पाठलागजुने शहरमध्ये कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी रात्रगस्तीत तातडीने निर्णय घेऊन चोरीस गेलेल्या ट्रकचा पाठलाग केला, त्यामुळे हा ट्रक पकडण्यात आला; अन्यथा ट्रकसह हे साहित्य मिळाले नसते, अशी प्रतिक्रिया किशोर मगरे यांनी दिली. पाटील यांनी तातडीने ट्रकचा पाठलाग करतानाच बुलडाणा व खामगाव पोलिसांचीही मदत घेतल्याने ट्रक पकडण्यात आला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन