शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Akola: दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला ‘पोह्या’ची वाट!

By संतोष येलकर | Updated: October 28, 2023 19:41 IST

Akola News: दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला - दिवाळीसाठी पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात संबंधित काही शिधाजिन्नसांचा पुरवठा झाला असला तरी, पोह्यांचा अत्यल्प साठा उपलब्ध झाला आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतरच ‘आनंदाचा शिधा’चे वितरण सुरू असून, त्यासाठी जिल्ह्यात पुरेसा ‘पोहे’साठा उपलब्ध होण्याची वाट आहे.

शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानुसार येत्या दिवाळी सणासाठी अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये पोहे आणि मैदादेखील दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यासाठी लागणाऱ्या संबंधित शिधाजिन्नसांची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार मागणीच्या तुलनेत २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हयात काही शिधाजिन्नसांचा साठा प्राप्त झाला; मात्र त्यामध्ये पोहे साठा अत्यल्प उपलब्ध झाला आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात पोह्याचा पुरेसा साठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.

२७ सप्टेंबरपर्यंत असा उपलब्धझाला शिधाजिन्नसांचा साठा !रवा ३ लाख ३३ हजार ९०४ किलोसाखर १ लाख ७१ हजार ८६९ किलो.चनाडाळ ९३ हजार ०५३ किलो.पामतेल १ लाख ८५ हजार ८०२ लीटरमैदा १ लाख ९५ हजार ०१४ किलो.

केवळ ३७ हजार किलो पोहे साठा उपलब्ध !दिवाळीसाठी जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकारधारक कुटुंबांना आनंदाचा शिधामध्ये वाटप करण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३७ हजार ६२० किलो पोहे साठा उपलब्ध झाला आहे.

३.३१ लाख कुटुंबांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’दिवाळीसाठी जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक ३ लाख ३१ हजार ५५१ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’चे वाटप रास्तभाव धान्य दुकानांमधून करण्यात येणार आहे. शिधाजिन्नसांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर हे वाटप सुरू होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAkolaअकोला