शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जलवाहिनी दुरुस्तीच्या कामावर ‘स्थायी’चा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:15 IST

अकोला : अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंत रस्त्यालगत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी प्रशासनाच्या निविदेला तत्कालीन स्थायी समितीने नकार दिला होता. त्यावर प्रशासनाने स्थायी समितीने नामंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे सादर केला. शासनाने हा ठराव अद्यापही विखंडित केला नसतानाच प्रशासनाने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम पूर्ण केले. या मुद्यावर मनपाच्या वर्तमान स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. 

ठळक मुद्देविखंडनासाठी ठराव शासनाकडेतरीही काम पूर्ण कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंत रस्त्यालगत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी प्रशासनाच्या निविदेला तत्कालीन स्थायी समितीने नकार दिला होता. त्यावर प्रशासनाने स्थायी समितीने नामंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे सादर केला. शासनाने हा ठराव अद्यापही विखंडित केला नसतानाच प्रशासनाने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम पूर्ण केले. या मुद्यावर मनपाच्या वर्तमान स्थायी समितीने आक्षेप घेतला आहे. अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंत प्रशस्त सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी निधी खेचून आणला. रस्त्याचे रुंदीकरण करण्यापूर्वी त्या ठिकाणची जलवाहिनी जुनी झाल्यामुळे ती बदलण्याचे आ. शर्मा यांनी मनपा प्रशासनाला निर्देश दिले होते. जोपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात नाही, तोपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करणे शक्य नव्हते. याप्रकरणी लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरील दबाव रास्त असल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी जलवाहिनी टाकण्यासाठी १ कोटी ८४ लाख निधीतून १ कोटी ६२ लाख रुपयांची निविदा प्रकाशित केली. प्राप्त निविदा मंजूर करीत प्रशासनाने अंतिम मंजुरीसाठी तत्कालीन स्थायी समितीकडे सादर केली होती. त्यावेळी भाजप नगरसेवक बाळ टाले, सतीश ढगे यांनी निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत फेरनिविदा बोलावण्याची मागणी रेटून धरली होती. तत्कालीन स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाची निविदा नामंजूर केल्यामुळे प्रशासनाने हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे सादर केला होता. शासनाने हा ठराव अद्यापही विखंडित केला नसला, तरी यादरम्यान प्रशासनाने जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम पूर्ण करून घेतले. याप्रकरणी स्थायी समिती सभापती बाळ टाले, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, भाजप नगरसेवक अजय शर्मा व सुनील क्षीरसागर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. 

प्रशासनाची कोंडी!अशोक वाटिका ते सरकारी बगीचापर्यंत सिमेंट रोडच्या रुंदीकरणाआड येणार्‍या जलवाहिनीचे जाळे तातडीने बदलण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या दालनात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली होती. त्यामध्ये आ. गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सदर जलवाहिनी तातडीने बदलण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते, हे येथे उल्लेखनीय.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका