शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीचा लोकसहभागातून होणार विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:14 IST

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी  नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा ‘अँक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी तयार केला ‘अँक्शन प्लॅन‘ नदीकाठचा चेहरा-मोहरा बदलणार! 

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी  नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा ‘अँक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. जिल्हा प्रशासन व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह  लोकसहभागातून गत १३ आणि २0 जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर शनिवारी राबविण्यात येणारी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम आणखी दोनदा राबविण्यात येणार आहे. नदीतील जलकुंभी आणि कचरा काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, अकोल्यातील नागरिकांच्या सहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी मोर्णा नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा ‘अँक्शन प्लॅन ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्राच्या परिसरात शोष खड्डे तयार करणे, नदी काठावर घाट उभारणे, एलईडी पथदिवे लावणे, वृक्षारोपण आणि उद्यानांची निर्मिती करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्याची वाट न बघता, अकोलेकरांच्या लोकसहभागातून दोन वर्षात मोर्णा नदीकाठी  विविध विकास कामांसह सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

मोर्णा ‘डीपीआर’ दीड वर्षांत शासनाकडे होणार सादरलोकसहभागातून मोर्णा नदी विकास आणि सौंदर्यीकरणाचे कामे सुरू करण्यात आल्यानंतर मोर्णा नदी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. दीड वर्षांत मोर्णा ‘डीपीआर’ जिल्हा प्रशासनामार्फत  शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोर्णा नदी विकास आणि सौंदर्यीकरणासाठी सामान्य अकोलेकर पुढे येतील व सक्रिय योगदानातून मोर्णा विकास करतील, असा मला विश्‍वास आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमcollectorतहसीलदारAkola cityअकोला शहर