शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Akola: कोटीवर वीज ग्राहकांची वीजबिल ऑनलाइन भरण्याला पसंती, तीन वर्षांत ३५ टक्के ग्राहकांची भर

By atul.jaiswal | Updated: July 4, 2023 14:58 IST

Akola: एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत.

- अतुल जयस्वालअकोला : एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.

महावितरणकडून ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व "महावितरण मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त रु. ५००० पेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी महावितरणने RTGS /NEFT द्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आलेला आहे.

१.२५ टक्के सूट‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे.

ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. तरी जास्तीतजास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.- फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, अकोला परिमंडळ, महावितरण

टॅग्स :Akolaअकोला