शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अकोला :तत्कालीन नगराध्यक्ष, ‘सीओं’च्या चौकशीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:40 IST

अकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी रोजी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मोहोड यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत.

ठळक मुद्दे अकोट न्यायालयाचा आदेश रस्ता, नाली व भिंंतीचे निष्कृष्ट काम करून अपहार केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी रोजी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मोहोड यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत.अकोट येथील कंत्राटदार शिवाजी केशवराव देशमुख, तत्कालीन मुख्याधिकारी समीर गुंजारीलाल लाठी, तत्कालीन अभियंता विलास चंद्रभान बोरकर, तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र टिकाराम बरेठिया, तत्कालीन नगरसेवक अफजल खान अमरुल्ला खान, रेशमा अंजुम अफजल खान, सादेकाबी इफ्तेखार अहेमद  यांच्याविरुद्ध अकोट येथील अब्दुल जमीर अब्दुल कादीर रा. अकबरी प्लॉट यांनी कलम १५६ (३) अंतर्गत अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यामध्ये संबधीतांनी अकोट नगर परिषद अंतर्गत सन २०१४ मध्ये अंजनगाव रस्त्याला लागून असलेल्या उर्दू स्कूल ते मौलाना आझाद स्कूलपर्यंतच्या रस्त्यात व इतर ठिकाणी असलेल्या नाली व भिंतीच्या कामात अपहार करून आर्थिक लाभ घेतला, लोकांची फसवणूक करून जनतेचा विश्वासघात केला. तसेच खोटी बिले तयार करून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप अब्दुल जमीर अब्दुल कादीर यांनी केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सुद्धा निवेदन देऊन उपोषण केले होते. त्यावर जिल्हाधिकाºयांनी प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गुणनियंत्रक विभाग अमरावती यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गुणनियंत्रण विभागाने आपला अहवाल सादर केला होता. तसेच यासंदर्भात अकोट एस.डी.ओ. यांनी सुद्धा चौकशी करून जिल्हाधिकाºयांना अहवाल दिला होता. त्यानंतर ३१ आॅगस्ट २०१६ ला अकोट शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने पोलीस अधीक्षक, अमरावती पोलीस महानिरीक्षक यांना दखलपात्र गुन्हा नोंदविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. तरी सुद्धा अपहार प्रकरणात सहभाग असलेल्यांवर कारवाई झाली नाही. कारवाई होत नसल्याने या प्रकरणी अब्दुल जमीर अब्दुल कादीर  यांच्या वतीने अ‍ॅड.नजीब शेख यांनी अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल केली. तसेच अपहार प्रकरणात सहभागी असलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, याकरिता आदेश देण्यात यावे, अशी विनंती केली होती. या प्रकरणी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट