अकोट येथील ज्येष्ठ विधिज्ञाची  सनद सहा महिन्यांसाठी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:54 PM2018-03-05T18:54:18+5:302018-03-05T18:54:18+5:30

अकोट : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र  व गोवाच्या शिस्तभंग समितीने अकोट येथील सुप्रसिद्ध अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांना वकीली व्यवसायातील गैरवर्तणूक सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून त्यांची वकीलीची सनद सहा महिन्यांसाठी निलंबित केली आहे.

senior lawyers license suspended for six months | अकोट येथील ज्येष्ठ विधिज्ञाची  सनद सहा महिन्यांसाठी निलंबित

अकोट येथील ज्येष्ठ विधिज्ञाची  सनद सहा महिन्यांसाठी निलंबित

Next
ठळक मुद्देअर्जामध्ये स्वत:चेच पक्षकार असलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांच्या विरुद्ध त्यांना जमानत न मिळावी म्हणून खोटे आरोप केले होते.हे प्रकरण प्रथम बार कौन्सिलचे स्पेशल कमिटीचे सदस्य आशिष देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आले. शिस्तभंग समितीने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांची सनद सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याचा आदेश पारित केला.



अकोट : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र  व गोवाच्या शिस्तभंग समितीने अकोट येथील सुप्रसिद्ध अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांना वकीली व्यवसायातील गैरवर्तणूक सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून त्यांची वकीलीची सनद सहा महिन्यांसाठी निलंबित केली आहे.
अकोट तालुका सहकारी सूतगिरणीतील प्रशासक मंडळाविरुद्ध दाखल फौजदारी प्रकरणात अ‍ॅड. आर.बी. अग्र्रवाल हे प्रशासक सुरेंद्र पोटे व नीळकंठ कुकडे यांचे वकील असताना आर.बी. अग्रवाल यांनी नीळकंठ कुकडे यांच्यातर्फे दाखल केलेल्या अर्जामध्ये स्वत:चेच पक्षकार असलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांच्या विरुद्ध त्यांना जमानत न मिळावी म्हणून खोटे आरोप केले होते. त्यामुळे अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टच्या कलम ३५ नुसार गैरवर्तणूक केली म्हणून अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांनी हे प्र्रकरण दाखल केले होते.
हे प्रकरण प्रथम बार कौन्सिलचे स्पेशल कमिटीचे सदस्य आशिष देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आले . या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांनी प्रथमदर्शनी अ‍ॅड. अग्रवाल यांना दोषी ठरवून हे प्रकरण तीन सदस्यीय शिस्तभंग समितीकडे पाठविले. शिस्तभंग समितीने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी अ‍ॅड. आर.बी. अग्रवाल यांची सनद सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणात आर.बी. अग्रवाल यांची बाजू अ‍ॅड. खापरे, नागपूर व अ‍ॅड. सत्यनारायण जोशी, अकोला यांनी तर अ‍ॅड. पोटे यांनी स्वत:ची बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: senior lawyers license suspended for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.