शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कृषी प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी कारवाईचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:47 IST

अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्‍यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्‍या गरजांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या योजनांत ५७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोळ केल्याप्रकरणी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्‍यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्‍या गरजांसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या योजनांत ५७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोळ केल्याप्रकरणी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल होणार आहे. शेतकर्‍यांसाठी विविध योजना समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयातून राबवल्या जातात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी खर्च केला जातो. शेतकर्‍यांना लाभाच्या योजना देताना शासनाने वस्तू खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करता समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालय अकोल्याचे तत्कालीन प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांनी २0१६-१७ मध्ये खरेदी प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेत निधीचा मोठा गोंधळ झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून पुढे आले. मार्च २0१७ पर्यंतच्या खरेदी प्रक्रियेत ५७ लाख रुपयांचा घोळ झाला. कमी किमतीच्या वस्तू अधिक दराने खरेदी करण्यात आल्या. पुरवठादारांशी संगनमताने हा प्रकार घडला. त्यानंतर गद्रे ऑगस्ट २0१७ अखेरपर्यंत पदावर कार्यरत होते. त्या कार्यकाळातील आर्थिक खरेदी व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यातही मोठी तफावत आढळून आली आहे.  लेखा परीक्षणाचा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालकांकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. या प्रकरणी झालेल्या वित्तीय अनियमितता आणि नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्यासाठी पोलिसात तक्रार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला. अकोल्याचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक शैलेश पाटील गुरुवारी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर