अकोला : कृषी प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध फौजदारी कारवाईचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:42 AM2017-12-21T01:42:50+5:302017-12-21T01:47:32+5:30
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत ५७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोळ केल्याप्रकरणी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार गुरुवारी पोलिसात तक्रार दाखल होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शेतकर्यांसाठी विविध योजना समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयातून राबवल्या जातात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी खर्च केला जातो. शेतकर्यांना लाभाच्या योजना देताना शासनाने वस्तू खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करता समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालय अकोल्याचे तत्कालीन प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांनी २0१६-१७ मध्ये खरेदी प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेत निधीचा मोठा गोंधळ झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून पुढे आले. मार्च २0१७ पर्यंतच्या खरेदी प्रक्रियेत ५७ लाख रुपयांचा घोळ झाला. कमी किमतीच्या वस्तू अधिक दराने खरेदी करण्यात आल्या. पुरवठादारांशी संगनमताने हा प्रकार घडला. त्यानंतर गद्रे ऑगस्ट २0१७ अखेरपर्यंत पदावर कार्यरत होते. त्या कार्यकाळातील आर्थिक खरेदी व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यातही मोठी तफावत आढळून आली आहे. लेखा परीक्षणाचा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालकांकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. या प्रकरणी झालेल्या वित्तीय अनियमितता आणि नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्यासाठी पोलिसात तक्रार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला. अकोल्याचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक शैलेश पाटील गुरुवारी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती आहे.