शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-जुने शहरातील हत्याकांड प्रकरण : मकोकातील आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:55 IST

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अटकेत असलेल्या तीन आरोपींना अमरावती येथील मकोकाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या तीनही आरोपींना विशेष न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देअमरावती येथील मकोका न्यायालयात केले हजर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अटकेत असलेल्या तीन आरोपींना अमरावती येथील मकोकाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या तीनही आरोपींना विशेष न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यामध्ये अश्‍विन उद्धवराव नवले, सागर कृष्णसा पुर्णये,  राहुल खडसान या तिघांचा समावेश आहे. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या शिवसेना वसाहतमधील रहिवासी तुषार नागलकर यांच्या घरी १४ डिसेंबरच्या मध्यरात्री मद्य प्राशन करून शैलेश अढाऊ, अश्‍विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशिष वानखडे व किशोर वानखडे यांच्यासह आणखी काही युवकांनी हैदोस घालून नागलकरला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकरणात तुषार नागलकर व त्याच्या भावडांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात  शैलेश अढाऊ याचा मृत्यू झाला होता, तर तुषार नागलकरही गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नागलकरवरील हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या किशोर वानखडे, अश्‍विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशू वानखडे यांच्या गुन्हेगारी पृष्ठभूमीच्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षकांकडे झाल्या. त्यांनी सदर सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी मकोका कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सहापैकी अटकेत असलेल्या सागर पुर्णये, राहुल खडसान, अश्‍विन नवले या तिघांना मकोकाच्या अमरावती येथील विशेष न्यायालयात हजर केले, न्यायालयाने तीनही आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तिघांच्या जामीन रद्दसाठी प्रयत्नकिशोर सुधाकर वानखडे, आशिष शिवकुमार वानखडे, मंगेश टापरे या तीन आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मात्र, या तीन आरोपींवर आता मकोकाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस न्यायालयात जाणार आहेत. या तीन आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना मकोकाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहर