शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Akola: ऑक्टोबर महिन्यात विविध खगोलीय घडामोडींची पर्वणी

By atul.jaiswal | Published: September 30, 2023 12:49 PM

Akola: नैऋत्य मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होत असते. आगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल असल्याने समस्त आकाश प्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

- अतुल जयस्वालअकोला - नैऋत्य मोसमी वारे परतीला लागल्यानंतर आकाश निरीक्षण करणे अधिक सोयीचे होत असते. आगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्र अशी दोन ग्रहणे, दोन उल्का वर्षाव, ग्रहांच्या चंद्र व ताऱ्यांसोबत युती, ग्रहांचे उदयास्त आदींची रेलचेल असल्याने समस्त आकाश प्रेमींसाठी ही अनोखी पर्वनी ठणार आहे.पृथ्वीवरून आपण पाच ग्रह, पाऊणेपाच हजार तारे आणि ८८ तारका समूह साध्या डोळ्यांनी सहज पाहू शकतो. सध्या स्थितीत गुरु शुक्र आणि शनि हे तीन महाग्रह आकाशात अतिशय विलोभनीय दर्शन देत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी बुध कन्या राशीत व शूक्र सिंह राशीत प्रवेश करेल. ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा पश्चिमेस अस्त, ६ ऑक्टोबरला रात्री ७ वाजता इंटर नॅशनल स्पेस स्टेशन दर्शन, ७ ऑक्टोबरला बुध ग्रहाचा पूर्वेकडे अस्त होत आहे. दि.७, ८व ९रोजी रात्री ड्रेक्रोनिड तारका समूहातून आणि २१व २२ ऑक्टोबर रोजी मृग नक्षत्र समुहातून ताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील.

सध्या अगदी रात्रीच्या प्रारंभी सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि वलयांकित ग्रह शनी हा रात्रीच्या प्रारंभी ते पहाटे पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे दर्शन देत आहे. शनी ग्रह सध्या कुंभ राशी समूहात आहे. त्यानंतर रात्री साडे आठ नंतर पूर्व क्षितिजावरच सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरु ग्रह हा आपल्याला अगदी ठळकपणे पहाटेपर्यंत पाहता येईल. त्यानंतर पहाटेच्या निवांत वेळी पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह आपल्याला चांगल्यापैकी बघता येईल. या तिन्ही ग्रहांचे दूर्बिणीतून दर्शन केल्यास आपल्याला शनी ग्रहाचे सुंदर वलय, आणि गुरु ग्रहाचे चार चंद्र चांगल्यापैकी पाहता येतील. तसेच पहाटेच्या वेळी शुक्र ग्रहाच्या चंद्रासारख्या कला बघता येतील. असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

२८ ऑक्टोबरला खंडग्रास चंद्रग्रहणआगामी ऑक्टोबर महिन्यात सूर्य व चंद्रग्रहणाचा योग आहे. यापैकी १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे, पण भारतात ते दिसणार नाही. शनिवार, २८रोजी मध्यरात्री नंतर होणारे खंडग्रास चंद्रग्रहण सूमारे सव्वा तास बघता येईल.

टॅग्स :Akolaअकोला