शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
3
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
4
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
5
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
6
SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र
7
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
8
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
9
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
10
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
11
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
12
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
13
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
14
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
15
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
16
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
17
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
18
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
19
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
20
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

By नितिन गव्हाळे | Updated: June 30, 2023 16:29 IST

विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले.

नितीन गव्हाळेअकोला : विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गुन्ह्यात सुनेसोबत अतिप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास शुक्रवारी १० वर्षांची शिक्षा व विनयभंग करणाऱ्या दिरास दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. 

या प्रकरणातील हकीगत अशी की, ६४ वर्षीय आरोपी सासऱ्याने त्याची सून घरी एकटी असताना तिचे सोबत अती प्रसंग केला व ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी २९ वर्षीय दिर हा त्याची वहिनी घरी एकटी असताना तिचा विनयभंग करीत असे. पीडिता माहेरी गेल्यावर तिने हा प्रकार तिच्या आईस सांगितला. त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. आरोपींवर सदर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यात. 

सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत व ए.पी. गोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास पीएसआय दीपक भगवान इंगळे यांनी केला. पैरवी म्हणून संतोष आंबीलवादे व प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले.

साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपीस खालील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपी सासऱ्यास भादंवि कलम ३७६, ३७६ (दोन)(के) मध्ये १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास. कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी दिरास कलम ३५४ मध्ये दोन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास. कलम ३५४-ए मध्ये एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली.  आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले.

टॅग्स :Molestationविनयभंग