शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मुलगा झाल्याची बातमी, हाती दिली मुलगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:42 IST

अकोला: प्रसूतीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु थोड्या वेळाने हातात मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात शनिवार, ५ मे रोजी चांगलाच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देसर्वोपचारमधील प्रकार बक्षिसीच्या हव्यासामुळे निर्माण झाला संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रसूतीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु थोड्या वेळाने हातात मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात शनिवार, ५ मे रोजी चांगलाच गोंधळ उडाला. रुग्णालयातील एका अज्ञात महिला कर्मचाºयाने बक्षिसीच्या हव्यासापोटी मुलगा झाल्याचे सांगितल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाल्याचे समोर आले. त्यानंतर कक्षातील डॉक्टरांनी दाम्पत्यास मुलगीच झाल्याची शहनिशा करून दिली आणि या गोंधळावर पडदा पडला.गोरगरीब रुग्णांसाठी हक्काचे स्थान असलेले येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या  घटनांसाठी चर्चेच्या झोतात आले आहे. सफाई कर्मचाºयाकडून रुग्णाच्या महिला नातेवाइकास रक्ताच्या मोबदल्यात शरीरसुखाची झालेली मागणी व अर्भक उघड्यावर फेकण्याच्या घटना सर्वोपचार रुग्णालयात घडल्या आहेत. यामध्ये आणखी भर टाकणारा प्रकार शनिवारी घडला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका गर्भवती महिलेला तिच्या नातेवाइकांनी प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले. स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वार्ड क्र. २ मध्ये सदर महिलेला भरती करण्यात आले. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यानंतर एका महिलेने प्रसूत झालेल्या महिलेच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर बक्षिसी म्हणून पैसेही घेतल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर थोड्या वेळाने महिलेच्या हातात बाळ म्हणून मुलगी देण्यात आली. मुलगी पाहताच नातेवाइकांनी गोंधळ घातला. आम्हाला मुलगा झाल्याचे सांगण्यात आले होते, आता मुलगी कुठून आली, असा प्रश्न करीत नातेवाइकांनी डॉक्टरांना जाब विचारला. यावेळी शस्त्रक्रिया कक्षात उपस्थित असलेल्या डॉक्टर व अधिपरिचारिकांनी नातेवाईकांना समजवून सांगितले. तसेच त्यांना मुलगीच झाल्याची पडताळणीही करून दिली. यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांना तक्रार करण्यासही सांगितले; परंतु नातेवाइकांनी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा गोंधळ मिटला.

नातेवाइकांची तक्रार नाहीमहिलेच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगून बक्षिसी उकळणाºया महिलेची तक्रार करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर किंवा अधिपरीचारिकांनी मुलगा झाल्याचे सांगितले होते का, असा प्रश्न यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी नातेवाइकांना केला; परंतु नातेवाइकांनी त्या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच या संदर्भात लेखी तक्रार देण्यासही नकार दिल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.  

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयnew born babyनवजात अर्भक