शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : राष्ट्रीय ड्यूबॉल स्पर्धेत गोवा संघाने कायम राखले अजिंक्य पद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:25 IST

अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता गोवा संघाने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर ड्यूबॉल स्पर्धेचे अजिंक्य पद कायम राखले.

ठळक मुद्देमुले व मुलींच्या दोन्ही गटात गोवा विजेता; दिल्ली उपविजेतागोवाचा इब्राहिम शेख व दिल्लीची प्राक्षी उत्कृष्ट खेळाडू

नीलिमा शिंगणे-जगडअकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता गोवा संघाने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर ड्यूबॉल स्पर्धेचे अजिंक्य पद कायम राखले.

संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम येथे मंगळवारी स्पर्धेचा समारोप झाला. मुलींच्या गटात गोवा व दिल्ली संघात रोमहर्षक सामना झाला. गोव्याच्या मुस्कानने ३ आणि प्राचीने २ गोल करू न संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीच्या प्राक्षीने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत २ गोल करण्यात यश मिळविले. गोवाने दिल्लीला ५-२ ने पराभूत केले. मुलींच्या गटात तेलंगणा संघाने तृतीयस्थान मिळविले. मुलांच्या गटातील अंतिम सामनासुद्धा गोवा व दिल्ली संघात झाला. गोव्याचा चपळ खेळाडू इब्राहिम शेख व उल्पत यांनी आक्रमक खेळप्रदर्शन करीत प्रत्येकी ४ गोल केले. शिवाजी नाईकने ३ आणि बाबूराव याने संधीचे सोने करीत १ गोल केला. दिल्लीचा कर्णधार इंद्रप्रीतसिंह याने ३ आणि रणजित याने १ गोल केला. मात्र, गोवाच्या आक्रमक खेळीसमोर दिल्लीची ताकद चालली नाही. मुलांच्या गटात गुजरात संघाला तृतीयस्थानावर समाधान मानावे लागले.स्पर्धेत मुलांच्या गटात गोव्याची निकिता, तर मुलांमध्ये दिल्लीचा सूर्यकांत यांनी उत्कृष्ट गोलरक्षण केले. सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार गोव्याचा इब्राहिम शेख आणि दिल्लीची प्राक्षी यांना मिळाला. प्रोत्साहन पुरस्कार राजस्थानची सुकना आणि महाराष्ट्राचा भूषण चंदनखेडे यांना मिळाला. शिस्तप्रिय संघाचा पुरस्कार मुलांमध्ये जम्मू-काश्मीर आणि मुलींमध्ये विदर्भ संघाला दिला.आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या हस्ते विजेता-उपविजेता संघांना विजयी ट्रॉफी देण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार हरिदास भदे, अविनाश देशमुख, दीपाली गोळे, पंकज जायले, पंकज साबळे, युवराज पडोळे, फिरोज खान, रवी कल्ले, उमेश कल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार बाजोरिया यांनी आपल्या भाषणात, ‘ड्यूबॉल खेलेंगा इंडिया तो आगे बढेगा इंडिया’ म्हणत  खेळाची प्रशंसा करू न, अकोल्यात आंतरराष्ट्रीय ड्यूबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.

टॅग्स :Sportsक्रीडाAkola cityअकोला शहरgoaगोवा