शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर डॉक्टरांकडून परस्पर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 11:06 IST

CoronaVirus in Akola पॉझिटिव्ह निघाल्यानंतर अकोलेकर खासगी डॉक्टरांकडून परस्पर उपचार घेत असल्याची माहिती आहे.

अकोला : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांची अकोलेकरांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर अकोलेकर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल न होता स्थानिक खासगी डॉक्टरांकडून परस्पर उपचार घेत असल्याची माहिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा वॉच नसल्यामुळे शहरात कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.मनपा क्षेत्रात कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या साहाय्याने मनपाच्या भरतीया रुग्णालयात रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट सुरू केल्या होत्या. मागील ४ सप्टेंबरपासून सदर टेस्ट बंद करण्यात आल्या असून, त्या ऐवजी पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या नाकातून नमुने गोळा करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची असुविधा आहे. त्या ठिकाणी साफसफाई, तसेच जेवणाचा दर्जा राखला जात नसल्यामुळे अकोलेकरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठ फिरवित स्थानिक खासगी कोविड सेंटरकडे धाव घेतली आहे.मनपाची वैद्यकीय यंत्रणा कामचुकारकोरोनाची चाचणी करण्यासाठी अकोलेकर मनपाच्या भरतीया रुग्णालयात किंवा आयएमए सभागृह येथे जात आहेत. चाचणीचा अहवाल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे दिल्यानंतरही संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका रुग्णाशी संपर्क साधण्यात कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. अहवाल विलंबाने प्राप्त होत असल्याने संबंधित रुग्णाकडून कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.... म्हणून रुग्णांची आकडेवारी उघड नाही!जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबमधील चाचणीचे दैनंदिन अहवाल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सादर केले जात आहेत; परंतु बाधित रुग्णांची आकडेवारी वर्तमानपत्रांना दिल्यास संबंधित रुग्णांचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी लागेल या विचारातून वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती, आकडेवारी उघड केली जात नसल्याची माहिती आहे. याकडे आयुक्त संजय कापडणीस लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला