शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

अकोला मनपाची गाडी सुसाट; १४ कोटींची विकास कामे निकाली

By admin | Updated: January 6, 2015 01:34 IST

मूलभूत सोयी, पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा.

अकोला: महापालिकेला मूलभूत सोयी सुविधा व पायाभूत सुविधांसाठी प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून १४ कोटी १६ लाखांची विकास कामे उशिरा का होईना प्रशासनाने निकाली काढली आहेत. बांधकाम विभाग, जलप्रदाय विभाग व विद्युत विभागाने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. प्रशासनाने ९ कोटी १९ लाख ५८ हजारांच्या कामांची ई-निविदा प्रकाशित केली असून, ५ कोटी ५९ लाख ४१ हजार ७६४ रुपयांच्या विकास कामांचे कार्यादेश (वर्कऑर्डर) देण्यात आले आहेत. एकूणच, मनपाची विकासात्मक गाडी सुसाट निघाल्याचे चित्र दिसून येत आहे.मूलभूत सोयी सुविधा व पायाभूत सुविधांसाठी मनपाला वर्षभरापूर्वी २६ कोटींचे व त्यानंतर पुन्हा दोन कोटींचे अनुदान प्राप्त झाले. तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या कार्यकाळात २६ कोटींतून होणार्‍या विकास कामांमधून तत्कालीन विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांना फक्त ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. भाजप-सेनेच्या विरोधाला झुगारून तत्कालीन सत्तापक्षाने २६ कोटींतून विकास कामांचे ६८0 प्रस्ताव तयार केले होते. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाड व विस्कळीत होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला २६ कोटींतून ११ कोटी ८४ लाख निधी देण्याचा ठराव मंजूर केला.सभागृहाने सुद्धा या प्रस्तावाला मंजुरी दिली. तेव्हापासून उर्वरित १४ कोटी १६ लाखांची कामे प्रलंबित होती. यामध्ये मनपातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलप्रदाय व विद्युत विभागाने सर्वसमावेशक विकास कामांचे प्रस्ताव सादर केले असता, या कामांना आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी मंजुरी दिली. एकूणच, आगामी दिवसात १५ कोटींतून १२ डांबरी रस्त्यांची दुरुस्ती, सहा सिमेंट रस्त्यांची निर्मिती तर १४ कोटी १६ लाखांतून सुद्धा विकास कामे पूर्ण केली जातील. मनपाच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विकास कामे मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.