शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपात ‘अनुकंपा’चे उमेदवार वाऱ्यावर; कंत्राटी पदभरतीला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:22 IST

अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे.

अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त कर्मचाºयांचा भरणा असून, उद्या सोमवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दुसरीकडे मागील २० वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नियुक्तीसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत. अशा ७४ उमेदवारांचा वाली कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.महापालिकेत कार्यरत कर्मचाºयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मागील २० वर्षांपासून पात्र ठरलेल्या उमेदवारांना अद्यापही मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याने राज्य शासन, महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेत अनुकंपाधारक उमेदवारांची संख्या ७४ पर्यंत असून, मागील अनेक वर्षांपासून त्यांना मनपात नोकरी न मिळाल्याने काही उमेदवारांनी वयाची मर्यादा पार केली आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. एकीकडे महापालिकेच्या आस्थापना खर्चात वाढ झाल्याची सबब पुढे करीत नवीन कर्मचाºयांची पदभरती करता येणार नाही, असे मत व्यक्त करणाºया प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने आजपर्यंत आउट सोर्सिंगच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. या बदल्यात संबंधित कंपनीला महिन्याकाठी लाखो रुपयांचे देयक अदा केले जात आहे. कंत्राटी कर्मचाºयांमध्ये बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त असल्याने त्यांची कार्यक्षमता कोण तपासणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.अनुकंपाधारकांसाठी आ. गोवर्धन शर्मांचा पुढाकारएकीकडे कोट्यवधी रुपयांच्या देयकांवर ताव मारणारे अधिकारी-पदाधिकारी दुसरीकडे आस्थापना खर्चात वाढ झाल्याने अनुकंपाच्या उमेदवारांची नियुक्ती करता येत नसल्याची सबब पुढे करतात. २००८ पासून अनुकंपाधारक उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. संबंधित उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. त्यानुषंगाने मध्यंतरी या विषयावर कार्यवाही करण्याचे पत्र नगरविकास विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी जारी केले होते. त्यावर आजपर्यंत प्रशासन व सत्ताधारी भाजपाने कोणताही निर्णय घेतला नाही, हे येथे उल्लेखनीय.

९३ कंत्राटी कर्मचाºयांची होणार नियुक्ती!मनपाच्या विभागांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वानुसार तब्बल ९३ कर्मचाºयांची पदभरती केली जाणार आहे. साहिल इंडस्ट्रीज, भोसरी पुणे यांच्यामार्फत कर्मचाºयांची पदभरती केली जात आहे. देयकाच्या बदल्यात महापालिकेला १५ लाख ५९ हजार ९९९ रुपये महिन्याकाठी अदा करावे लागतील. अर्थात, वर्षभरात हा खर्च दीड कोटींपेक्षा जास्त होणार आहे.संघर्ष समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हअनुकंपाच्या उमेदवारांना नोकरीत सामावून न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देणारी मनपातील संघर्ष समिती गेली कोठे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊन समितीमधील पदाधिकाºयांची भूमिका संशयाच्या घेºयात सापडली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका