शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाचा विद्युत विभाग झोपेत; मुख्य रस्ते, प्रभाग अंधारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:59 IST

अकोला : शहराच्या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागील महिनाभरापासून पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर ...

अकोला: शहराच्या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागील महिनाभरापासून पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर अंधार पसरला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, प्रभागातील पथदिव्यांचा बोजवारा उडालेला असताना महापालिकेचा विद्युत विभाग व झोननिहाय कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र समोर आले आहे. या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, नगरसेवकांचे उदासीन धोरण नागरिकांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.शहरात लख्ख उजेड देणाऱ्या एलईडी पथदिव्यांच्या उभारणीसाठी शासनाने १० कोटींचा निधी दिला आहे. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत २० कोटींच्या कामाचे कार्यादेश जारी केले. शहरात रॉयल इलेक्ट्रिॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश असून, पथदिवे उभारणीचे काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचा दावा मनपाच्या विद्युत विभागाकडून केला जात आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार पाहता महापालिकेचा विद्युत विभाग व झोननिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. या गंभीर प्रकाराची मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दखल घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.दुरुस्तीच्या नावाखाली पथदिवे बंद!शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे सतत नादुरुस्त राहत असल्याचे चित्र आहे. दुभाजकांमधील खांबावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीला दोन-दोन महिन्यांचा कालावधी कसा लागू शकतो, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मध्यंतरी खांबांना कलर लावण्याचे काम सुरू होते. कंत्राटदाराच्या तांत्रिक चुकीमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराची विद्युत विभाग दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

झोननिहाय कंत्राटदारांची मनमानीपथदिव्यांची यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी मनपा प्रशासनाने पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. यामध्ये पूर्व व उत्तर झोनसाठी ए.जे. इलेक्ट्रिक, पश्चिम झोनसाठी शरद पॉवर कंट्रोल व दक्षिण झोनकरिता ब्राइट इलेक्ट्रिक अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली. ब्राइट इलेक्ट्रिक कंपनी वगळता उर्वरित तीनही कंत्राटदार स्थानिक असल्यामुळे त्यांना शहराच्या गल्लीबोळातील माहिती आहे. असे असले तरी नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदारांना मुहूर्त सापडत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका