शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेत विरोधी पक्षाची हवा गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:06 IST

शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती  असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे.  सत्ताधार्‍यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे

ठळक मुद्देमूलभूत सुविधांचा बोजवाराविरोधकांनी साधली चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून  शहरासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्याची जबाबदारी विरोधी पक्षाने  निभावणे अपेक्षित आहे. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्तपद मागील अनेक दिवसां पासून रिक्त आहे. तसेच शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती  असताना मनपातील विरोधी पक्षांनी साधलेली चुप्पी खटकणारी ठरत आहे.  सत्ताधार्‍यांसमोर विरोधी पक्षाची हवा गूल झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. महापालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग निष्क्रिय असल्यामुळे शहरात सर्वत्र  घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाचे सफाई कर्मचारी मुख्य रस्त्यांसह प्रभागातील  अंतर्गत रस्त्यांची झाडपूस करत नसल्याने रस्त्यांवर धुळीचे ढीग साचले आहेत.  धुळीमुळे अकोलेकरांना श्‍वसनाचे आजार जडत असून, नागरिक हैराण झाले  आहेत. प्रभागातील नाल्या, गटारांची नियमित साफसफाई होत नसून, सांड पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची  दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. धरणात जलसाठा कमी असल्याने  नागरिकांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेचे तत्कालीन  आयुक्त अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंतही नवीन अधिकार्‍यांची  नियुक्ती झाली नाही. मनपाचे दोन्ही उपायुक्त पद रिक्त आहेत. महापालिकेचे एकूणच  चित्र पाहता विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असताना सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षांनी  साधलेल्या चुपीमुळे अकोलेकरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. प्रशासकीय  अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याचा स्थानिक कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे  दिसून येते. प्रशासनाचा ढेपाळलेला कारभार व सत्ताधार्‍यांच्या भूमिकेवर विरोधी पक्ष  काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने हल्लाबोल करणे  अपेक्षित असताना विरोधकांनी तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. सत्ताधार्‍यांसमोर  विरोधी पक्ष हतबल ठरत असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

शासनाकडे दाद कधी मागणार?महापालिकेसह राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असूनही महिनाभरापासून मनपाचे  आयुक्त पद रिक्त कसे, असा सवाल विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी उपस्थित  केला होता. सत्ताधार्‍यांनी आयुक्तपदी नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती न केल्यास  काँग्रेसच्यावतीने आम्ही शासनाकडे दाद मागणार असल्याचे साजिद खान यांनी  प्रसिद्धी पत्रकात नमूद केले होते. मनपाचा ढेपाळलेला कारभार पाहता विरोधी पक्षने ता शासनाकडे कधी दाद मागणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

मुख्य रस्त्यांची झाडलोट नाहीच!प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची दररोज झाडलोट करणे महा पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना क्रमप्राप्त आहे. अंतर्गत रस्त्यांची कधीही झाडलोट  होत नाही. मुख्य रस्त्यांची पंधरा दिवसातून एखाद्या वेळी थातूरमातूरपणे झाडलोट  केल्यानंतर माती उचलून न नेता दुभाजकालगत साचवून ठेवतात. वाहनांमुळे हीच  माती पुन्हा रस्त्यावर येते. यासह विविध समस्या असताना यापैकी एकाही समस्येवर  तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही.-

टॅग्स :Akola cityअकोला शहर