शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:11 IST

अकोला : महापालिकेच्या मालकीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी भूमी अभिलेख विभागाला नमुना ‘ड’ची मूळ प्रत सादर  करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असून, त्यासंदर्भात नगररचना विभागाने तयार केलेल्या फाइलला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ मंजुरी देणार आहेत.

ठळक मुद्देसिटी कोतवाली पोलिसांनी मागितली माहितीनगरसेविका पतीच्या अडचणी वाढणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या मालकीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी भूमी अभिलेख विभागाला नमुना ‘ड’ची मूळ प्रत सादर  करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असून, त्यासंदर्भात नगररचना विभागाने तयार केलेल्या फाइलला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ मंजुरी देणार आहेत. दुसरीकडे या प्रकरणी मनपाच्यावतीने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल असल्यामुळे पोलिसांनी प्रशासनाकडे माहिती मागितली असून, प्रशासनाच्या माहितीनंतर नगरसेविका पती शेख इब्राहिम यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत आहेत. महापालिकेच्या मालकीचा अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेला नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ नुसार चार हजार चौरस फूट भूखंड प्रकाशझोतात आला आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे आहे. असे असले तरी सदर भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगररचना विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहीम यांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाची सर्रास विक्री झाल्याचे ‘लोकमत’ने समोर आणताच मनपा प्रशासन व भूमी अभिलेख विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणाचा ऊहापोह होताच सदर भूखंडाची फेरफार नोंद रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक योगेश कुळकर्णी यांनी शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावे असलेल्या भूखंडाच्या फेरफार नोंदीचे पुनर्विलोकन केले. त्यानंतर सदर भूखंडाच्या फेरफार नोंदीमध्ये असलेले शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावाची नोंद रद्द करून हा भूखंड महापालिकेच्या नावाने नोंदणी करण्यात आला आहे. फेरफार नोंदीची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. मनपाचे नगररचनाकार विजय इखार यांनी फेरफार नोंद रद्द केल्यानंतर जमिनीचा नमुना ‘ड’ची मूळ प्रत मिळवण्यासाठी फाइल तयार केली असून अंतिम मंजुरीसाठी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे सादर केली आहे. 

सिटी कोतवाली पोलीस प्रतीक्षेत!मनपाचा भूखंड हडप केल्याप्रकरणी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या विषयी सिटी कोतवाली पोलिसांनी मनपाकडे माहिती मागितली असून, त्यानंतर दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती आहे.

मनपाच्या मालकीची जागा हडप करण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी नगररचना विभागाच्या आवक-जावकमधील नोंदी तपासण्याची सूचना केली आहे. दोषींची हयगय केली जाणार नाही. -जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका