शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘एसटीपी’च्या जागेवर अकोला नगररचना विभागाचे शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:13 IST

अकोला शहरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा शेती किंवा  उद्योगासाठी वापर करता येणार्‍या दुहेरी अशा भूमिगत गटार योजनेतील ‘एसटी पी’(सिवरेज ट्रीटमेन्ट प्लान्ट)च्या जागेवर सहायक संचालक नगररचना  विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

ठळक मुद्दे‘भूमिगत’चा मार्ग मोकळा; शिलोडा परिसरात उभारणार प्लान्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा शेती किंवा  उद्योगासाठी वापर करता येणार्‍या दुहेरी अशा भूमिगत गटार योजनेतील ‘एसटी पी’(सिवरेज ट्रीटमेन्ट प्लान्ट)च्या जागेवर सहायक संचालक नगररचना  विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. शिलोडा परिसरात सहा एकर जागेवर ३0  एमएलडी प्लान्टच्या अनुषंगाने मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारल्या जाणार  आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय किंवा प्रभारी  जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असून,  त्यानंतर संबंधित कंपनीला कार्यादेश दिला जाईल. प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित लवादाचे नियम-निकष धाब्यावर बसवित सद्यस् िथतीत शहरातील घाण सांडपाणी, घातक रसायन थेट मोर्णा नदीच्या पात्रात  सोडले जाते. परिणामी मोर्णा नदी दूषित झाली असून, नदीकाठच्या भागातील  पाण्याचे स्रोतसुद्धा दूषित झाले आहेत. साहजिकच याचा परिणाम  अकोलेकरांच्या आरोग्यावर होत आहे. या सर्व बाबींवर उपाय म्हणून ‘अमृत’  योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. राज्य शासनाने भूमिगत गटार योजनेंतर्गत ३0 आणि सात एमएलडी असे दोन  प्लान्ट उभारण्यासाठी ७९ कोटी २३ लाख रुपये मंजूर केले. घाण सांड पाण्यावर पुनप्र्रक्रिया करून त्याचा वापर शेती किंवा उद्योगासाठी करता येईल,  अशी ही दुहेरी योजना आहे.  मनपा प्रशासनाने ६१ कोटी २४ लाख रुपये किम तीच्या कामाची निविदा प्रकाशित केली असता, ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनी  ठाणे यांच्यावतीने ८.९१ टक्के जादा दराची निविदा तसेच विश्‍वराज इन्फ्रा कंपनी  नागपूरच्यावतीने ७२ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली होती. यापैकी ईगल  इन्फ्रा लिमिटेडच्या निविदेला स्थायी समिती सभेने २२ सप्टेंबर रोजी मंजुरी  दिली. योजनेतील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘एसटीपी’ जागेसाठी शिलोडा परिसरा तील सहा एकर जागा मनपाने निश्‍चित केली. जागेच्या शासकीय मोजणीसाठी  भूमी अभिलेख विभागाकडे २६ हजार रुपये शुल्क जमा केले. तसेच प्रस्ताव  सहाय्यक संचालक नगररचना विभागाकडे सादर केला. संबंधित विभागाने ‘डीपी प्लान’वर ‘एसटीपी’साठी जागा निश्‍चित केली आहे.  जागेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला  जाईल. जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी देताच भूमिगत गटार योजनेचे काम  स्वीकारणार्‍या ईगल इन्फ्रा कंपनीला मनपाकडून कार्यादेश दिला जाईल. 

 दोन ठिकाणी ‘एसटीपी’भूमिगत योजनेंतर्गत ३0 आणि सात एमएलडीचे प्लान्ट दोन ठिकाणी उभारल्या  जातील. यामध्ये एक शिलोडा परिसरानजिक आणि दुसरा खरप शिवारात  उभारला जाईल. मोर्णा नदीच्या काठावर एका बाजूने एक हजार व्यास व  दुसर्‍या बाजूला ६00 व्यास तसेच खरप शिवारातील नाल्याजवळ ६00  व्यासाची भली मोठी पाइपलाइन बसवल्या जाणार आहे. शहरात १४  किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात येईल. योजनेच्या एकूण  कामांपैकी ६१ कोटींचा खर्च उपरोक्त कामांवर केला जाणार आहे.

नगरसेवकांची चुप्पी संशयास्पद‘भूमिगत’ची निविदा काढताना योजनेचा ‘डीपीआर’ आणि ‘एसटीपी’च्या  मुद्यावर आक्षेप घेत खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अजय शर्मा, सुनील  क्षीरसागर, सुजाता अहिर, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, काँग्रेसचे अँड. इ क्बाल सिद्दीकी, पराग कांबळे यांनी १३ सप्टेंबर रोजी आयोजित स्थायी समि तीच्या सभेत निविदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर २२ स प्टेंबर रोजी स्थायीने निविदेला मंजुरी दिल्यानंतर संबंधित सर्व नगरसेवकांनी  अचानक चुप्पी साधणे पसंत केले असून, माशी शिंकली कोठे, असा प्रश्न सुज्ञ  अकोलेकर उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMuncipal Corporationनगर पालिका