शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अकोला महापालिकेचा आकृतिबंध रखडला; कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:55 PM

अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदूनामावली आणि सरळ सेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके ...

अकोला: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदूनामावली आणि सरळ सेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी किती आहेत, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली होताच ही प्रक्रिया ठप्प पडली असून, कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे प्रशासनाने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे. संबंधित एजन्सीला दिल्या जाणारे मोठ्या रकमेचे देयक पाहता आउटसोर्सिंगच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.महापालिकाच नव्हे तर इरतही प्रशासकीय यंत्रणांमध्ये तेथील उपलब्ध कर्मचाºयांच्या संख्येनुसार कामकाज पार पडते. अर्थात, त्या-त्या विभागात कार्यरत कर्मचारी किती आणि ते कोणत्या संवर्गातील आहेत, ही बाब महत्त्वाची ठरते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत मागील १५ वर्षांपासून रखडलेल्या बिंदूनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याने बिंदूनामावली अंतर्गत सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभाग, नगररचना, बांधकाम आदी विभागात तांत्रिक संवर्गातील कर्मचाºयांची अपुरी संख्या पाहता प्रशासनाने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले होते. यादरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही बाब पाहता महापालिकेचा आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आकृतिबंधाची प्रक्रिया क्लिष्ट असली तरी त्याची गरज ओळखून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन-तीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील जुजबी माहिती प्रशासनाकडे सादर केल्यानंतर ही प्रक्रिया ठप्प पडल्याचे चित्र आहे.मनपाची घडी विस्कटलेली!महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलप्रदाय, नगररचना विभाग, शिक्षण विभाग, कोंडवाडा, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभाग, अर्थ व वित्त विभाग, आरोग्य व स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आदी विभागांमध्ये पात्रता नसणाºया कर्मचाºयांकडे महत्त्वाचे पदभार सोपविण्यात आले आहेत. त्यांच्या अधीनस्थ किती कर्मचारी कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याबाबत सावळा गोंधळ आहे. याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

कर्मचाºयांचा मनमानी कारभारमहापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचाºयांमध्ये आनंदी आनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील २ हजार २०० कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. अशा क ामचुकार कर्मचाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी आकृतिबंध मंजूर होणे नितांत गरजेचे झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका