शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:19 IST

अकोला : महापालिकेतील एका कर्मचार्‍याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे ४ हजार रुपयांची लाच मागणार्‍या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी सायंकाळी हा सापळा रचून यशस्वी कारवाई करण्यात आल्याने महापालिके तील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्दे‘एसीबी’ची मोठी कारवाई; हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी घेतली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील एका कर्मचार्‍याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे ४ हजार रुपयांची लाच मागणार्‍या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी सायंकाळी हा सापळा रचून यशस्वी कारवाई करण्यात आल्याने महापालिके तील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.महापालिकेच्या एका ३२ वर्षीय कर्मचार्‍याला वेतन मिळण्यासाठी हजेरी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असलेला आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड (४९) रा. निबंधे प्लॉट, लहान उमरी याने कर्मचार्‍यास हजेरी पत्रक देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार १२ फेब्रुवारी रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी १२ फेब्रुवारीला पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यामध्ये आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तक्रारकर्त्यासोबत रक्कम देण्यासाठी १३ फेब्रुवारी मंगळवार दिवस ठरला. मंगळवारी सायंकाळी सुरेश पुंड याने लाच स्वीकारताच सापळा रचून असलेले एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने लाचखोर पुंडला लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संजय गोर्ले, संतोष, सुनील राऊत व इंगळे यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका