शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

अकोला महापालिकेला जुनी टॅक्स वसुली करावी लागणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 10:27 AM

Akola Municipal Corporaton प्रशासनाला वाढीव दराची थकीत टॅक्स वसुली बंद करावी लागणार आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर खंडपीठाने मालमत्ता कराची अवाजवी दरवाढ फेटाळून लावत एका वर्षाच्या कालावधीत नवीन करप्रणाली तयार करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते. तसेच वाढीव दराने लागू केलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी एका वर्षाची मुदत दिली होती. ही मुदत येत्या १३ आॅक्टोबर रोजी संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर प्रशासनाला वाढीव दराची थकीत टॅक्स वसुली बंद करावी लागणार आहे. याचा परिणाम चालू वर्षाच्या करावर होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे दिसत आहे. मनपा प्रशासनाने दर तीन वर्षानंतर शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. १९९८ सालापासून मनपाने पुनर्मूल्यांकन केले नव्हते. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सन २०१६ मध्ये जीआयएस प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारित करप्रणाली लागू केली. यावेळी सत्तापक्ष भाजप व प्रशासनाने अवाजवी वाढ केल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर आॅक्टोबर २०१९ मध्ये सुनावणी झाली असता द्विसदस्यीय खंडपीठाने मनपाने केलेली करवाढ फेटाळून लावली होती. तसेच एक वर्षांच्या कालावधीत वाढीव दरानुसार लागू केलेली थकीत रक्कम वसूल करण्याची मुभा देत या कालावधीत नवीन कर मूल्यांकन प्रणाली लागू करण्याचे निर्देश होते; परंतु थकीत रक्कम वसूल करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.१६५ कोटींपैकी फक्त १५.७२ कोटी वसूल४सन २०१९-२० मधील ९४ कोटी ९१ लक्ष रुपयांचा मालमत्ता कर थकीत असून, यापैकी फक्त ८ कोटी ९२ लक्ष रुपये वसूल झाले. चालू आर्थिक वर्षात ७० कोटी ४४ लाखांची थकबाकी असून, यापैकी केवळ ६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अर्थात १६५ कोटी रकमेतून केवळ १५ कोटी ७२ लक्ष रुपये वसूल झाले.

 

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोलाTaxकर