शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका हद्दवाढीला लागणार ‘कात्री’!

By admin | Updated: April 4, 2016 02:22 IST

मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा; गोपीकिशन बाजोरिया यांची लक्षवेधी.

अकोला: महानगरपालिकेचे क्षेत्र २५ चौरस किलोमीटरवरून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत विधिमंडळात जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला आहे. हद्दवाढीसाठी अनावश्यक भूभागाचा समावेश प्रस्तावित करण्यात आल्याने, हद्दवाढीला 'कात्री' लागण्याची शक्यता आहे. अकोला महानगरपालिकेची हद्द वाढवून लगतच्या २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली असून, १७ एप्रिलपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत; मात्र त्यापूर्वीच मनपाची ह्यहद्दवाढह्ण विधिमंडळात पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी उपस्थित केली असून, ती मंगळवारी पटलावर येणार आहे. यात त्यांनी मनपाची हद्द २५ चौरस किलोमीटरहून १२४ चौरस किलोमीटरपर्यंत वाढविली जात असल्याबाबत आक्षेप नोंदवून अनावश्यक भूभाग जोडण्यात येत असल्याने, यातून उपस्थित होणार्‍या अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. वाढते नागरीकरण आणि मनपा हद्दीतील विकासाचा वेग बघता २५ किलोमीटरमध्ये जो विकास साधता आला नाही, तो पुढे १२४ चौरस किलोमीटरच्या हद्दीत कसा साधता येईल, असा प्रश्न उपस्थित केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना दिली. त्यामुळे मनपा क्षेत्रालगत असलेल्या वस्त्यांचाच समावेश मनपा क्षेत्रात करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.'ना इधर के, ना उधर के'!सध्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून वित्त, आरोग्यासह विविध विकास निधी मिळतो. ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेला हा निधी कोट्यवधींच्या घरात आहे. मनपा क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या ग्रामपंचायतींना मिळणारा निधी बंद होईल. याशिवाय या भागापर्यंत विकास पोहोचण्याकरिता किमान २0 वर्षे लागतील. त्यामुळे ग्रामपंचायतींचा हा भाग सर्वच विकासनिधीपासून वंचित राहणार आहे. भरिस भर या परिसरातील नागरिकांना महापालिका कराचा बोजाही सहन करावा लागेल.शेतीयोग्य जमिनीचा प्रश्नप्रस्तावित हद्दवाढीनंतर शहराच्या सीमांपासून दूर असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र मनपा हद्दीत येणार आहे. त्यामुळे मनपा क्षेत्र आणि या गावांपर्यंत असलेल्या शेकडो एकर शेतजमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे. सिलोडा, चांदूर, खरप, भौरद आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणारी शेकडो एकर जमीन यामुळे नाहक अकृषक होणार आहे.