शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

शौचालयांचा घोळ दडपला; नवीन शौचालयांच्या प्रस्तावासाठी मनपा सरसावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:38 IST

शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य करीत पुनर्तपासणीचे निर्देश देणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन शौचालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने भाजपच्या पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला: मनपाचे आरोग्य निरीक्षक व कंत्राटरांनी ‘जिओ टॅगिंग’ न करताच शहरात १८ हजारांपेक्षा अधिक शौचालयांची उभारणी केली. या बदल्यात प्रशासनाने कंत्राटदारांच्या देयकांपोटी २९ कोटी रुपयांची उधळपट्टी केली. या प्रकरणाची तक्रार खुद्द सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी केल्यानंतरही महापालिकेने हा घोळ दडपल्याचे दिसून येत आहे. शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य करीत पुनर्तपासणीचे निर्देश देणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन शौचालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने भाजपच्या पारदर्शी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत घरी शौचालय नसणाºया नागरिकांचा सर्व्हे करून त्यांना शौचालय उभारून देण्यासाठी प्रशासनाने खासगी कंत्राटदारांच्या नियुक्त्या केल्या. स्वच्छता विभागाने व कंत्राटदारांनी शौचालय बांधण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ करणे बंधनकारक होते. तसे न करता लाभार्थींच्या जुन्या शौचालयांना रंगरंगोटी करून त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे देयक उकळल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, गिरीश गोखले, काँग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी क रीत चौकशी समितीची मागणी केली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये हा घोळ उघडकीस आल्यानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर अनेकदा चर्चा होऊन कारवाईची मागणी करण्यात आली. मागील नऊ महिन्यांपासून प्रशासनाने या गंभीर प्रकरणी ठोस निर्णय न घेतल्यामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.आयुक्तांवर कोणाचा दबाव?मनपाचे तत्कालीन उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीचा अहवाल महापौर विजय अग्रवाल यांनी अमान्य करीत पुनर्तपासणी करण्याचे निर्देश २२ फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत प्रशासनाला दिले होते. त्यावर महिन्याभरात चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांना दिले होते. त्यापुढे काहीच झाले नाही. घोळातील कोट्यवधींची रक्कम लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांच्यावर कारवाई न करण्यासाठी नेमका कोणाचा दबाव आहे, या दबावाला आयुक्त बळी पडले का, असे नानाविध सवाल उपस्थित झाले आहेत.नवीन शौचालय कोण बांधणार?महापौर विजय अग्रवाल यांनी नवीन शौचालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाला लावलेला कोट्यवधी रुपयांचा चुना पाहता नवीन शौचालये कोण बांधणार, त्यासाठी नव्याने कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून नगरसेवकांची मुस्कटदाबी?भाजपकडून नेहमीच स्वच्छ व पारदर्शी कारभाराचा दावा केला जातो. भाजपच्या या प्रतिमेवर विश्वास ठेवत अकोलेकरांनी २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ४८ सदस्य निवडून दिले. सभागृहात ८० पैकी ४८ नगरसेवक भाजपचे असले तरी धोरणात्मक निर्णय घेताना पक्षातील सर्व नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचे चित्र अनेकदा समोर आले आहे. शौचालय घोळाची तक्रार खुद्द भाजपच्याच नगरसेवकांनी केल्यावरही प्रशासन कारवाई करीत नसेल, तर पक्षाकडून नगरसेवकांची मुस्कटदाबी होत आहे का, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका