शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
3
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
4
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
5
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
6
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
7
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
8
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
9
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
10
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
11
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
12
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
13
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
14
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
15
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
16
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
17
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
18
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
19
'सैयारा' चित्रपट पाहिला अन् एका गर्लफ्रेंडसाठी दोन तरुण भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
20
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!

प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

By आशीष गावंडे | Updated: September 7, 2022 19:05 IST

अकोला महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : अकोला महापालिका कर्मचाऱ्यांना विलंबाने का होईना अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने बुधवारी घेतला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून वाढीव वेतनापोटी तिजोरीवर महिन्याकाठी सुमारे एक कोटी विस लक्ष रुपयांचा भार पडणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन लागू करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र होते. उत्पन्न नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना सातत्याने थकीत वेतनाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. 

महापालिकेने उत्पन्नात वाढ न केल्यास विकास कामांसाठी एक छदामही देणार नसल्याची भूमिका तत्कालीन भाजप- शिवसेना युती सरकारने घेतली होती. शासनाची रोखठोक भूमिका लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने सन २०१६ मध्ये मालमत्तांचे पुनमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. मूल्यांकन केल्यानंतर सुधारित करवाढ लागू करण्यात आल्याने मनपाच्या तिजोरीत मालमत्ता करापासून ७० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघण्यास मदत झाली. तसेच प्रलंबित असलेल्या सहाव्या वेतन आयोगातूनही थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करणे प्रशासनाला शक्य झाले. यादरम्यान, राज्य शासनाने २०१६ रोजी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी लावून धरली होती. 

सातव्या वेतन आयोगावर सभागृहाचा शिक्कामोर्तब मनपा कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेता सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सादर केला होता. त्यावर सभागृहाने एक नोव्हेंबर २०२१ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी बुधवारी केली. 

१७०० कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार बारा कोटींचा खर्चमहापालिकेत वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीत ५६९ कार्यरत कर्मचारी असून सफाई कर्मचाऱ्यांची संख्या ७४० आहे. तसेच २५४ शिक्षक सेवारत आहेत. यासह इतर कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास सुमारे १७०० कर्मचाऱ्यांच्या वेतनावर प्रशासनाला महिन्याकाठी १२ कोटी २० लक्ष रुपये अदा करावे लागणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका7th Pay Commissionसातवा वेतन आयोगEmployeeकर्मचारी