शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाईला ठेंगा; देयकांसाठी नगरसेवकांचा आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:25 IST

अकोला: पडीक प्रभागात दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत महापालिका प्रशासनाने देयकांमध्ये मोठी कपात केली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसाठी प्रशासकीय प्रभाग तर खासगी सफाई कर्मचाºयांसाठी पडीक प्रभाग अशी रचना आहे.लिदा ओरपणाºया नगरसेवकांनी रक्कम कपात न करण्यासाठी महापालिकेत धावाधाव सुरू केली आहे.

अकोला: पडीक प्रभागात दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत महापालिका प्रशासनाने देयकांमध्ये मोठी कपात केली आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून स्वत: दुकानदारी करणाºया काही नगरसेवकांनी देयकाची रक्कम कमी न करण्यासाठी जीवाचा आटापिटा चालविल्याची माहिती आहे. साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन गंभीर असले, तरीही नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसाठी प्रशासकीय प्रभाग तर खासगी सफाई कर्मचाºयांसाठी पडीक प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे.संपूर्ण शहरात स्वच्छतेची कामे करण्यास मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. यात तथ्य असले, तरी पडीक प्रभागातही साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येते. काही ठरावीक प्रभागातील नाल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ५१ पडीक भागांची निर्मिती केली. त्यासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. एका पडीक प्रभागासाठी ४८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रशासकीय असो वा पडीक प्रभागात नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसह खुल्या मैदानांची नियमित साफसफाई होणे अपेक्षित असताना आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसह खासगी कर्मचाºयांनी साफसफाईला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे. ही बाब महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात करण्यासोबतच पडीक प्रभागातील कंत्राटदारांच्या देयकात कपात करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले आहेत. जून, जुलै तसेच आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यात कंत्राटदारांच्या देयकातून मोठी रक्कम कपात करण्यात आल्याची माहिती आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कंत्राटदारांच्या आडून मलिदा ओरपणाºया नगरसेवकांनी रक्कम कपात न करण्यासाठी महापालिकेत धावाधाव सुरू केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका