शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे दस्तऐवज जमा करताना अकोला मनपाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:34 IST

अकोला : शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे नमूद करीत या प्रकरणी महापालिका प्रशासनाने रस्त्यासंदर्भात प्रकाशित केलेली निविदा प्रक्रिया, कामांचे अंदाजपत्रक, जारी केलेले कार्यादेश व अदा केलेली रक्कम आदी इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी

ठळक मुद्देआस्तिककुमार पाण्डेय यांनी देताच मनपाच्या बांधकाम विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निकृष्ट सिमेंट रस्त्याच्या मुद्यावर प्रशासनाने ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला नोटीस जारी केल्याची माहिती आहे.प्रशासनाने पाच दिवसांचा अवधी मागितला असून, ही मुदत बुधवार, १८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

अकोला : शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे नमूद करीत या प्रकरणी महापालिका प्रशासनाने रस्त्यासंदर्भात प्रकाशित केलेली निविदा प्रक्रिया, कामांचे अंदाजपत्रक, जारी केलेले कार्यादेश व अदा केलेली रक्कम आदी इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी देताच मनपाच्या बांधकाम विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. १४ जुलैपासून बांधकाम विभागाच्या संपूर्ण यंत्रणेची दस्तऐवज जमा करताना चांगलीच दमछाक होत असून, निकृष्ट सिमेंट रस्त्याच्या मुद्यावर प्रशासनाने ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला नोटीस जारी केल्याची माहिती आहे.अतिवृष्टीने दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत मनपा प्रशासनाला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून सहा सिमेंटचे व बारा डांबराचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करीत १८ फूट रुंद रस्ते ३८ फूट केले. स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शन कंपनीला सिमेंट रस्त्याचा कंत्राट मिळाला. २०१५ या कालावधीत सिव्हिल लाइन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांची कामे पूर्ण झाली. मध्यंतरी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पाहणीत मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे समोर आले. या प्रकरणी मनपा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस जारी करून इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुषंगाने मनपाने सुद्धा सिमेंट रस्त्यांप्रकरणी ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस जारी करण्यासोबतच दस्तऐवज जमा करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू केले आहे.सिव्हिल लाइन रस्त्याची दुरुस्ती सुरूमनपाच्या अखत्यारित तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनंतर कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला आहे. सात दिवसांपूर्वी टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट मार्गावरील हॉटेल स्कायलार्क तसेच एलआयएसी आॅफीस समोर पडलेले खड्डे बुजविण्यात आले. १५ जुलै रोजी अग्रसेन चौक ते दुर्गा चौक रस्त्यावर दुरुस्तीचे काम केल्यानंतर १६ जुलै रोजी पुन्हा लेडी हार्डिंग रुग्णालयासमोरील खड्डे बुजविण्यासोबतच सिव्हिल लाइन रस्त्यावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

बुधवारी मुदत संपुष्टातसिमेंट रस्त्यांप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना नोटीस जारी करून, खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. नोटीसला उत्तर सादर करण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा अवधी मागितला असून, ही मुदत बुधवार, १८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका