शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाची सुधारित करवाढ नियमबाह्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 14:20 IST

हायकोर्टाचा निर्णय सर्वसामान्य अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मनपाने सुधारित करवाढ लागू करून अकोलेकरांजवळून वसूल केलेल्या मालमत्ता कराची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आदेश नागपूर उच्च न्यायालयातील द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी देत याचिकाकर्ते डॉ. जिशान हुसेन यांची याचिका निकाली काढली आहे. हायकोर्टाचा निर्णय सर्वसामान्य अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरणारा आहे.मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर अव्वाच्या सव्वा दराने आकारलेली करवाढ नियमानुसार नसल्याचे नमूद करीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात मार्च २०१८ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती.दीड वर्षाच्या कालावधीत या मुद्यावर वेळोवेळी सुनावणी झाली असता, राज्य शासन व मनपाच्या विधिज्ञांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वारंवार मुदत मागितली होती, हे विशेष. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१५-१६ मध्ये ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत सुधारित करवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला होता. त्यावेळी सत्ताधारी भाजपने केवळ विकास कामांसाठी आर्थिक हिस्सा जमा करता यावा, याकरिताच टॅक्सच्या रकमेत मनमानी पद्धतीने वाढ करून ठराव पारित केल्याचा आरोप नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी केला होता. याप्रकरणी डॉ. हुसेन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता, द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी मनपाच्या संपूर्ण प्रक्रियेवर ताशेरे ओढले. मनपाने केलेली सुधारित मालमत्ता करवाढ रद्द करून वर्षभराच्या कालावधीत नव्याने कर मूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देऊन हा सर्वसामान्य अकोलेकरांचा विजय असल्याचे नमूद केले.

चार दिवस अन्नत्याग; त्याचे फळ!सत्ताधारी भाजपने मनमानीरीत्या वाढवलेली टॅक्सची रक्कम मागे घ्यावी, यासाठी मनपा कार्यालयासमोर चार दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याआंदोलनात शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची साथ होती. अन्नत्याग आंदोलनाचे फलित झाल्याची भावना यावेळी डॉ. हुसेन यांनी व्यक्त केली.नागपूर उच्च न्यायालयाने सुधारित करवाढ नियमबाह्य ठरविली. या आदेशाचे अवलोकन केल्यानंतर यासंदर्भात राज्य शासनाकडून कायदेशिर मार्गदर्शन घेण्यात येईल. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासंदर्भात दिशा ठरविण्यात येईल.- संजय कापडणीस,आयुक्त, महापालिका

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाHigh Courtउच्च न्यायालय