शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा मोबाइल डाटा मनपा तपासणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 11:02 IST

मनपा प्रशासनाने पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना विषाणूचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आलेल्या शहरातील बैदपुरा व अकोट फैल परिसरातील रुग्णांच्या संपर्कात कोणते व्यक्ती होते, याचा तपास करण्यासाठी महापालिकेने संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा मोबाइलचा डाटा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून, अकोला शहरातही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत.७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा भागातील ६२ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर अवघ्या अठरा तासांतच प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या अकोट फैल परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. ही बाब गंभीरतेने घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व अकोट फैल परिसराला ‘सील’ करून संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला.दरम्यान, १० एप्रिल रोजी बैदपुरा येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या कुटुंबातील आणखी तीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार आरोग्य पथकाने संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित कोरोना बाधित रुग्णांनी माहिती दिली नाही. हा प्रकार पाहता संबंधित रुग्णांचा मोबाइल डाटा तपासण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.

गत २० दिवसांचा डाटा तपासणार!बैदपुरा तसेच अकोट फैल येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या रुग्णांचा गत २० ते २५ दिवसांचा मोबाइल डाटा तपासण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. याकरिता मनपाने पोलिसांच्या सायबर सेलकडे हा डाटा व त्यांचे मोबाइल लोकेशन तपासून देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका