शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महाबीजच्या संचालकपदी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पाचव्यांदा विजयी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:11 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.

ठळक मुद्देविदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले.त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.उर्वरित महाराष्ट्रातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूरचे वल्लभराव देशमुख हे अविरोध निवडून आले.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.तसेच उर्वरित महाराष्ट्रातून  बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूरचे वल्लभराव देशमुख हे अविरोध निवडून आले. देशमुख आणि धोत्रे हे दोघेही पाचव्यांदा महाबीजच्या संचालकपदी विजयी झाले.संपुर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या महाबीजच्या कृषक भागधारकांनी महाबीजच्या विदर्भ व उर्वरित महाराष्टÑासाठी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यायचे होते.१३ जानेवरी रोजी निवडणूक झाली, २० जानेवरी रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल महाबीजचे निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी विदर्भ विभाग मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे यांना विजयी तर उर्वरित महाराष्ट्रातून वल्लभराव देशमुख अविरोध विजयी घोषित केले. या संचालक पदासाठी टपाल मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यात आली. विदर्भ मतदार संघातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व नांदुरा तालुक्यातील सर्व कृषक भागधारक मतदान मतदान केले. तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख रिंगणात होते त्यांना परभणी, हिंगोली,लातूर,नांदेड,सोलापूर,उस्मानाबाद,जालना, बीड,औरंगाबाद,अहमदनगर,पुणे,जळगाव,धुळे,नाशिक,नंदूरबार,कोल्हापूर,सांगली,सातारा,ठाणे व मंबई तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व नांदुरा वगळून सर्व तालुक्यातील सर्व कृषक भागधारकांना संचालक निवडून द्यायचे होते.तथापि उर्वरित मतदार संघातून दर्शन वल्लभराव देशमुख अमडापूर,किशोर बापू वाणी(जवाहर रोड ,पारोळा, जी. जळगाव),हरिभाऊ श्रीराम येवले (महिमाळ,ता. चिखली,जि.बुलडाणा) या तिघांनी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक न होता वल्लभराव देशमुख अविरोध निवडूण आले.या दोन्ही संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांच्याहस्ते पुढील तीन वर्षासाठी महाबीजचे संचालक म्हणून प्रमाणपत्र दिले.यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावकर, महापौर विजय अग्रवाल,भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.विदर्भात ३,४६९ भागधारकविदर्भ मतदार संघात ३,४६९ कृषक भागधारक आहेत. या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. या मताचे मूल्य १३,७२१ एवढे होते. यापैकी संजय धोत्रे यांना ९,४०६ तर प्रशांत गांवडे यांना ३,९८३ मते पडली. या मतांची बेरीज १३,३८९ एवढी आहे तर ३३२ मतदाराचे मत अवैध ठरले.

टॅग्स :MahabeejमहाबीजAkola cityअकोला शहरSanjay Dhotreसंजय धोत्रे