शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला वेग; जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन लागले कामाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:04 AM

अकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ  मोर्णा’ आता वेग धरत आहे.  मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच काही स्वयंसेवी संस्था आपला सहभाग दररोज देत आहे.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्था, नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ  मोर्णा’ आता वेग धरत आहे.  मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच काही स्वयंसेवी संस्था आपला सहभाग दररोज देत आहे.मोर्णा नदीच्या गीता नगर भागातील खराब प्लॉस्टिक, जलकुंभी आणि कचरा यामुळे अतिशय कठीण असलेला थर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने सदर भाग तोडून काढण्यात येत आहे. यासाठी दोन पोकलॅन्ड व २0 मजूर उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या देखरेखीखाली काम करत आहेत. यासाठी लागणारे दोन पोकलॅन्ड लखन गावंडे व रेल्वेचे कंत्राटदार दीपक कारगल पुणे यांच्याकडून विनामूल्य प्राप्त झालेल्या आहेत. तहसीलदार संघटनेने दिलेल्या निधीतून १0 मजूर व मनपा प्रशासनाकडून १0 मजूर असे एकूण २0 मजूर काम करत आहेत. उप विभागीय अधिकारी संजय खडसे तसेच मनपाचे अधिकारी वेळोवेळी सहभाग घेऊन त्यांचा उत्साह वाढवत आहेत.आता नुकत्याच ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन स्वच्छ  मोर्णा’अभियानाचा उल्लेख करून जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी सह अकोलेकरांचे कौतुक केल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध संघटना स्वयंस्फूर्तीने मिशन स्वच्छ मोर्णामध्ये सहभाग नोंदवून श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. येत्या शनिवारी मिशन स्वच्छ मोर्णा अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहर